मेहकर व लोणार पोलीस कर्मचाऱ्यांना निवासस्थाने व कार्यालय बांधकामासाठी लवकरच निधी मिळणार-गृहराज्यमंत्री बैठकीत निर्णय..
तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा । समाधान बंगाळे
आज दि.17 जून ला मुंबई मंत्रालय येथे मेहकर व लोणार येथील पोलिसांना निवासस्थाने व कार्यालय बांधकामासाठी लवकरच निधी मिळणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले आहे.आज दि.१७ ला मुंबई येथे मेहकर मतदार संघातील मेहकर, लोणार, डोणगाव, जानेफळ येथील पोलीस कर्मचाऱ्यांना निवासस्थाने व कार्यालय बांधकाम संदर्भात गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या दालनात बैठक संपन्न झाली. बैठकीला खासदार प्रतापरावजी जाधव,आमदार तथा पंचायत राज समिती अध्यक्ष संजयजी रायमुलकर ,जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत,माजी आमदार शशिकांतजी खेडेकर हजर होते. बैठकीत मंत्री महोदयांनी सांगितले की राज्यातून पोलीस कर्मचारी निवासस्थान व कार्यालय बांधकामासाठी ३०० प्रस्ताव आले होते.पहिल्या टप्प्यात जिल्हा स्तरावरील निवासस्थाने करिता निधी मंजुरात सुरू आहे. लवकरच पहिला टप्पा संपून दुसऱ्या टप्प्यात मेहकर व लोणार चा समावेश करण्यात आला आहे.यावेळी खा.प्रतापराव जाधव व आ.संजयजी रायमुलकर यांनी मंत्र्यांना सांगितले की मेहकर हे आता नागपूर मुंबई महामार्गावरील मुख्य शहर आहे तर लोणार हे जागतिक कीर्तीच्या सरोवरासाठी प्रसिद्ध आहे. तेव्हा दोन्ही ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना निवासस्थाने व कार्यालय बांधकामासाठी लवकर निधी मंजूर करण्यात यावा.
यावर गृहमंत्र्यांनी आश्वासन दिले की दुसऱ्या टप्प्यात मेहकर व लोणारचा समावेश असून लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अंतिम निर्णय घेतील. तर तिसऱ्या टप्प्यात डोणगाव व जानेफळ येथे कर्मचारी निवासस्थाने होतील असे बैठकीत ठरल्याचे स्वीय सहाय्यक रूपेश गणात्रा यांनी कळवले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा पोलीस स्टेशनचे विभाजन करून देऊळगाव मही येथे पोलीस स्टेशन सुरू करावे व निवासस्थाने, कार्यालय बांधण्यात यावे तसेच बीबी, संग्रामपूर, मोताळा येथे कर्मचारी निवासस्थाने व कार्यालय बांधकामासाठी सुध्दा निधी मंजूर करावा या शिवसेना खासदार प्रतापरावजी जाधव यांच्या मागणीबाबत सुध्दा गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी होकार दिला आहे.ना संदिपांनजी भूमरे ,मा ना अब्दुलजी सत्तार उपस्थित होते.बुलडाणा जिल्याचे खासदार प्रतारावजी जाधव तसेच सिंदखेडराजा मतदार संघाचे माजी आमदार शशिकांतजी खेडेकरआणि मेहकर मतदार संघाचे आमदार संजयजी रायमुलकर यांच्या कार्याच्या मागणीच्या कौतुकांचा वर्षाव सर्वञ बुलडाणा जिल्यातील पोलीस यंञनेकडून तसेच नागरिकांकडून जिल्यात होत आहे तसेच ग्रुहराज्यमंञी शंभुराज देसाई यांनी घेतलेल्या अप्रतिम निर्णयाचे स्वागत बुलडाणा जिल्यातील पोलीस यंञणेनी तसेच नागरिकांनी केले आहे.
