अंबाशी येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी ......
विशाल गवई तालुका प्रतिनिधी चिखली 7083304124
बुलडाणा (प्रतिनिधी) : दि.३१ मे रोजी रिदा आफरीन फाऊंडेशनच्या वतीने अंबाशी येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शेख वहिद सर यांनी आहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अहिल्याबाई होळकर या केवळ एक महान शासकच नव्हे तर पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत अश्या धनुर्धर देखील होत्या. अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व केले आणि विजय संपादन केले असे मत यावेळी रिदा आफरीन फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहसिन खान बिसमिल्ला यांनी व्यक्त केले. तसेच कोविड -१९ च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून अतिशय साध्य पध्दतीने जयंती करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते शेख शाकिर, शेख कादिर, जावेद खान, शेख शाहरुख, सामाजिक कार्यकर्ते मो.अजहर, शेख आबिद, शेख इम्रान, शेख रेहान, शेख फिरोज, सै.ताहेर, नंदकिशोर शेजुळ आदी उपस्थित होते.
---------------------------------------------------------
