साखरखेर्ङा येथील दुचाकीच्या अपघातातील जखमी तरूण युवकाची उपचारा दरम्यान अखेर प्राणज्योत मालवली

 साखरखेर्ङा येथील दुचाकीच्या अपघातातील जखमी तरूण युवकाची उपचारा दरम्यान अखेर प्राणज्योत मालवली

तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा:समाधान बंगाळे

सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्ङा या मुळ गावी राहत असलेला 24वर्षीय तरूण युवक पवण गणेश शिराळे याचा दुचाकीवरून पडून अपघात झाला होता तसेच त्याच्या डोक्याच्या मागील बाजुला गंभिर दुखापत झाली होती.त्याला त्वरीत जखमी अवस्थेत चिखली ग्रामिण रूग्नालय येथे हलविण्यात  आले तसेच पुढील ऊपचाराठी औंरगाबाद येथील घाटी रूग्नालया मध्ये रेफर करण्यात आले.तेव्हापासून पवन गणेश शिराळे हा तरूण युवक रूग्नालयामध्ये ऊपचार घेत होता.तसेच पवन साखरखेर्ङा पोलीस चौकीसमोर आपला बुट पाॅलीशचा व्यवसाय करून ऊदरनिर्वाह भागवीत असे पण नियतीने पवनवर असा घाला घातला की,अखेर पवनची उपचारा दरम्यान 1जुन रोजी सकाळी प्राणज्योत मालवली.पवनची मृत्युची बातमी जशी वाय्रासारखी साखरखेर्ङा परिसरामध्ये पसरली तेव्हापासून वातावरण अगदी शोकाकुलमय झाले होते.पवनचे पार्थिव औंरगाबाद येथुन साखरखेर्ङा येथे आणण्यात आले होते तसेच शोकाकुल वातावणामध्ये पवनवर 1जुन रोजी सांयकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.पवनचा स्वभाव अतिशय प्रेमळ,मायाळू,दयाळू,चांगुलपणा हे पवनच्या स्वभावातले मुख्य गुण होते.पवनने आपल्या शिराळे परिवाराच्या तसेच संबधीतांच्या आणि साखरखेर्ङा परिसरातील मिञ मंडळीच्या मनामध्ये एक चांगुलपणाचं बिज रोवलं होत त्याच्या या चांगुलपणाच्या आठवणी शिराळे परिवारांच्या,संबधीतांच्या तसेच मिञ मंडळीच्या मनामध्ये सतत दरवळत राहतील अशा भावना सर्वांनी पवनबद्धल व्यक्त केल्या आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler