महिला व बालविकास विभाग अमरावती बहुजन हिताय सोसायटी यांच्याकडून अनाथांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

 महिला व बालविकास विभाग अमरावती बहुजन हिताय सोसायटी यांच्याकडून अनाथांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


_अनाथ विकास संस्थेचा उपक्रम_

गेल्या दोन वर्षांपासून चालू असलेल्या महामारीमुळे राज्यातील अनाथ आश्रमांमधून बाहेर पडलेले अनाथ मुलं मुली यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे,त्यांचे राहायचे आणि खायचे वांदे झाले आहेत,त्यामुळे  आज महिला बाल विकास विभाग अमरावती आणि बहुजन हिताय सोसायटी यांच्याकडून  अनाथ मुलामुलींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे अनाथांना थोडा दिलासा मिळणार आहे,

सदर मदतीसाठी बहुजन हिताय सोसायटी, महिला व बालविकास विभाग अमरावती आणि अनाथ विकास संस्था यांनी परीश्रम घेतले यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी भडांगे सर आणि बहुजन हिताय सोसायटी चे पदाधिकारी तसेच अनाथ विकास संस्थेचे   अमित वासनिक ,मनीष डोंगरे, मयूर गोरे , योगेश नागिलवार, चेतन निंघोट,माधुरी सावंत आदी उपस्थित होते ,

 जिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा अश्या मुलामुलींना मदत करण्याचे आवाहन संस्थे कडून करण्यात आले आहे

अश्या अनाथ मुलामुलींना मदतीसाठी आपण 8766715053, 9545832719 संपर्क करू शकता

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler