स्वराज्य संघटना महिला आघाडीच्या मोर्शी तालुक्का अध्यक्ष पदी सौ सुषमा रवींद्रजी उभाड यांची नियुक्ती करण्यात आली.

  स्वराज्य संघटना महिला आघाडीच्या मोर्शी तालुक्का अध्यक्ष पदी सौ सुषमा रवींद्रजी उभाड यांची नियुक्ती करण्यात आली.

संपादक - ओम जायभाये      

7058807386     

आज रिद्धपुर सर्कल च्या दौऱ्यावर असताना स्वराज्य संघटना संस्थापक अध्यक्ष मोहित अढाऊ यांच्या हस्ते अमरावती जिल्हा मधील मोर्शी तालुक्का येथील स्वराज्य महिला आघाडीची सुरवात करण्यात आली व स्वराज्य महिला आघाडीच्या मोर्शी तालुक्का अध्यक्ष पदी सौ सुषमा रवींद्रजी उभाड यांची नियुक्ती करण्यात आली.त्यावेळी स्वराज्य संघटना सचिव शुभम बाहेकर.व स्वराज्य संघटना कमिटी सदस्य यश लांडे,व स्वराज्य संघटना ब्राम्हणवाडा दिवे शाखा अध्यक्ष सागर दिवे हे उपस्थित होते.तेव्हा गावातील उपसरपंच रवींद्रजी उभाड यांच्या उपस्थितीत शुभम बाहेकर यांच्या हस्ते आर्यन चौधरी यांची स्वराज्य संघटना दाभेरी मीडिया  प्रमुख पदी नियुक्त करण्यात आलं आहे त्यांना संघटनेच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या व स्वराज्य महिला आघाडीच्या नवनियुक्त पद भार लवकर करण्यात येईल असे सांगण्यात आले व महिलांच्या हक्का करता तसेच त्यांना न्याय मिडवून देण्या करता आपण सदैव त्याच्या कामात पुढाकार घेऊन त्यांचे विषय मार्गी लावणार व संघटना मजबूत करणार असा त्यांच्या कडून प्रतिसाद देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler