अल्पवयीन मुलगी घरून बेपत्ता, नविन वागदरा येथील प्रकरण

 अल्पवयीन मुलगी घरून बेपत्ता, नविन वागदरा येथील प्रकरण


 वणी तालुका प्रतिनिधी.

 अमोल बांगडे.9823787376



 

वणी, (३ जुलै) : अल्पवयीन मुली घरून बेपत्ता होण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. राजूर कॉलरी येथील मजूर कुटुंबातील अल्पवयीन मुलगी घरून बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतांनाच आज ३ जुलैला वणी शहरालगतच्या नविन वागदरा येथे राहणारी मजूर कुटुंबातीलच एक अल्पवयीन मुलगी घरून बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे.


रात्री कुटूंबासोबतच झोपलेली अल्पवयीन मुलगी अचानक कुणालाही न सांगता घरून घरून निघून गेल्याची तक्रार पोलिस स्टेशनला प्राप्त झाली आहे. मुलीला कुणी तरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय मुलीच्या आईने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीतून व्यक्त केला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 


शहरालगत असलेल्या नविन वागदर येथे वास्तव्यास असलेल्या मजूर कुटुंबातील अल्पवयीन मुलगी घरून अचानक बेपत्ता झाली. रात्री कुटुंबासोबत झोपलेली मुलगी घरून अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबं चांगलच हादरलं आहे. कुटुंबातील दोघी बहिणी एकत्र झोपल्या होत्या. वडिलांना सकाळी ४ वाजता अचानक जाग आली, व पहिले तर मोठी १५ वर्षीय मुलगी झोपलेल्या जागी दिसली नाही. ही बाब त्यांनी आपल्या पत्नीच्या निदर्शनास आणून दिली. नंतर पती पत्नींनी शेजाऱ्यांकडे चौकशी करून मुलीच्या शोधात अख्ख गाव पालथं घातलं. पण मुलीचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. आई वडिलांनी नातेवाईकांकडेही तिचा शोधाशोध घेतला. परंतु तेथेही ती आढळून आली नाही. ती घरून निघून गेल्याचा संशय आल्याने आई वडिलांनी आज दुपारी ४.३० वाजता पोलिस स्टेशन गाठून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. तसेच मुलीला कुणी तरी फूस लावून पळवून नेल्याचाही संशय मुलीच्या आईने तक्रारीतून व्यक्त केला आहे.


पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि च्या कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊनमुळे शाळा आद्यपही सुरु न झाल्याने शाळकरी मुलं मुली चुकीच्या मार्गाकडे वळताना दिसत आहे. बेपत्ता झालेली मुलगीही ९ व्या वर्गात शिकत होती. 

पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler