आर आर (आबा) सुंदर ग्रामपंचायत योजने अंतर्गत चिमुर तालुक्यातून सिरपुर ग्रामपंचायत प्रथम.
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे मो, 7038115037
गावकऱ्यांच्या सहकार्याने पटकविला प्रथम क्रमांक
प्रतिनिधी नेरी। चिमूर तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीने आर आर पाटील सुंदर ग्रामपंचायत योजने अंतर्गत शासन निर्णयातील निकषा प्रमाणे एकूण स्वयंमूल्याकन अहवालातुन सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक देण्यात येतो या योजनेत सिरपूर ग्रामपंचायतीने सर्वात जास्त गुण घेऊन प्रथम येण्याचा मान मिळविला
संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना चे रूपांतर करून स्मार्ट ग्राम योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे सदर योजनेस आर आर पाटील (आबा)सुंदर ग्रामपंचायत योजना असे नाव देण्यात आले आहे या योजने अंतर्गत प्रत्येक तालुक्यात शासन निकक्षाप्रमाणे काम केलेल्या ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक देण्यात येथे या सुंदर ग्रामपंचायत योजनेत तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीचे निकष तपासून एक ग्रामपंचायत शासन निकष मूल्याकंन व गुणांकांच्या आधारे निवडण्यात येते यावर्षी सिरपूर ग्रामपंचायतीने सुंदर असे कार्य करीत गावकरी आणि ग्रा प चे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य कर्मचारी वर्ग यांच्या मदतीने आर आर सुंदर ग्रामपंचायत योजनेत तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला या योजनेत प्रथम येण्यासाठी गावकऱ्यांनी मोलाचे कार्य करीत प्रत्येक कार्यात ग्रामपंचायतीला मदत केली प्रत्येक योजनेत भाग घेतला सर्व ग्रा प सदस्य आणि पदाधिकारी व कर्मचारी यांनीसुद्धा महत्वाची भूमिका बजावली त्यामूळे मूल्यांकना मध्ये जास्तीत जास्त गुण मिळाले
या योजनेत जिल्हातील 15 तालुक्यातील ग्रामपंचायतीने भाग घेतला होता यात 15 ग्रामपंचायतीची आर आर पाटील सुंदर ग्रामपंचायत निवड करण्यात आली आहे तर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील सोनापूर देश या ग्रामपंचायतीने मूल्यकन आणि सर्वाधिक गुणांच्या आधारे जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकीविला
या सुंदर ग्राम योजनेत सिरपूर गाव प्रथम आल्याबद्दल गटविकास अधिकारी प स चिमूर विस्तार अधिकारी ग्रामसेवक लोकचंद भसारकर सिरपूर आणि सर्व अधिकारी वर्गानी सिरपूर ग्रा प चे आभार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या
