महा-आवास अभियान ग्रामीण अंतर्गत तालुका स्तरीय सर्वोत्कृष्ठ पुरस्कार सोहळा संपन्न.

 महा-आवास अभियान ग्रामीण अंतर्गत तालुका स्तरीय सर्वोत्कृष्ठ पुरस्कार सोहळा संपन्न.


ब्रम्हपूरी तालुका प्रतिनिधी

: २4 ऑगष्ट २०२१

मनोज अगळे


        आज दिनांक २३अॉगष्ट २०२१ रोज सोमवारला पंचायत समिती ब्रम्हपुरीचे कर्मयोगी संत गाडगेबाबा समागृह येथे ब्रम्हपूरी पंचायत समिती स्तरावरील महा-आवासअभियान २०२०-२१(ग्रामीण) अंतर्गत, प्रधान मंत्री आवास योजना, व राज्य पुरस्कृत आवास योजना  पुरस्कार वितरण सोहळा मा. सौ. सुनिताताई ठवकर उपसभापती पंचायत समिती ब्रम्हपुरी, यांचे अध्यक्षतेखाली मा. थानेश्वरजी कायरकर सदस्य पंचायत समिती ब्रम्हपुरी, मा. निलकंठजी मानापुरे सदस्य पंचायत समिती ब्रम्हपुरी, मा. डॉ. शिरीष रामटेके गट विकास अधिकारी पं.स. ब्रम्हपुरी यांचे उपस्थितीत घेण्यात आले. 

         सदर कार्यक्रमात प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सर्वोत्कृष्ठ प्रभाग- अऱ्हेरनवरगांव-नान्होरी प्रभाग, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम- वांद्रा ग्रामपंचायत, द्वितीय-सोंद्री ग्रामपंचायत, तृतिय-मुडझा ग्रामपंचायत, सर्वोत्कृष्ठ घरकुल लाभार्थीं प्रथम- इंदिरा नामदेव सेलोटे नान्होरी, द्वितीय-शंकर भिवा बुल्ले बेलगांव जाणी, तृतीय-राजेन्द्र जयराम वरंभे हरदोली.

        राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीण अंतर्गत - सर्वोत्कृष्ठ क्लचर (प्रभाग)- गांगलवाडी-मेंडकी प्रभाग, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम - बोरगांव ग्रामपंचायत, द्वितीय- सुरबोडी ग्रामपंचायत, तृतीय- बोडेगांव ग्रामपंचायत, सर्वोत्कृष्ट घरकुल लाभार्थीं,  प्रथम- उदाराम शंभरकर वांद्रा, द्वितीय- संदेश हिरामण मेश्राम नान्होरी, तृतीय- टेकेश्वर मनिराम लोखंडे सोनेगाव, याप्रमाणे पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

          यावेळी तालुक्यातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत सरपंच, सचिव व घरकुल लाभार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler