पालकमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते अग्निशमन गाडीचे लोकार्पण व नप शाळेच्या पहिल्या मजल्याचे उदघाटन
संदीप कांबळे 9421318021
गडचिरोली शहर प्रतिनिधी
स्थानिक नगरपरिषदेने वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत अत्याधुनिक अग्निशमन गाडी खरेदी केली. त्या गाडीचे आज पोलीस मुख्यालय येथील पटांगणावर नगरविकास,सार्वजनिक बांधकाम मंत्री(म.रा.) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच जवाहरलाल नेहरू नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा(ISO) रामनगर येथील नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या पहिला मजला इमारतीचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार,आमदार डॉ. देवराव होळी,जिल्हापरिषद अध्यक्ष अजय कंकडालवार,नगराध्यक्ष सौ.योगिताताई पिपरे,पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील,जिल्हाधिकारी दिपक सिंघला,पोलीस अधीक्षक अंकित गोयल,मुख्यकार्यपालन अधिकारी कुमार आशीर्वाद,भाजपा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोद पिपरे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रुडे ,माजी आमदार नामदेवराव उसेंडी,नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर ,नगरसेविका वैष्णवी नैताम, नप मुख्याधिकारी संजीव ओव्होळ,नप शिक्षण विभाग प्रमुख बंडु ताकसांडे व ईतर मान्यवर उपस्थित होते.

