नेरी - जांभुळघाट रस्ता ठरतो अपघाताला आमंत्रण खड्डयात रस्ता की रस्त्यात खट्टे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे मो, 9673472206
चिमुर तालुक्यातील नेरी जांभुळघाट रस्त्यावर खड्डे च खड्डे पडल्याने वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.नेरी येथील पिएचसी चौकापासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत व त्याही पलीकडे या डांबरीकरण रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याने वाहन चालवावे कसे असा प्रश्न वाटसरुंना, मोटारसायकल स्वार,चारचाकी वाहन धारकांना पडला आहे अनेक दिवसांपासून या रस्त्यावर मोठाले खड्डे पडलेले असुन संबंधित विभागाकडून हे खड्डे बुजविण्याचे पाऊल का उचलण्यात येत नाही असा प्रश्न अनेकांना सतावत आहे या मार्गावर आज पहाटे एक धानाचा ट्रक सुद्धा फसला होता.त्यामुळे वाहतूक समस्या निर्माण झाली होती. आजपर्यंत या रस्त्यावर खड्यामुळे अनेक वाहनांची नुकसान झाली आहे मागील दोन ते तिन वर्षापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले, मात्र अल्पावधीतच डांबर उखडून गेल्याने या रस्त्याचे बांधकाम निक्रुष्ट दर्जाचे करण्यात तर आले नाही ना असाही प्रश्न गावकऱ्यांना भेडसावत आहे
या रस्त्याचे रुंदीकरण करून खड्डे त्वरित बुजवून रस्ते वाहतुकीस सुरळीत करण्यात यावे अशी जनतेची मागणी आहे.
