चिमुर तालुक्यातील बोथली गावात गावकऱ्यांनी लावून दिला आंतरजातीय प्रेमी युगलाचा प्रेमविवाह
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे मो, 7038115037
प्रतिनिधी नेरी। नेरीवरून जवळ असलेल्या बोथली येथील एका आंतरजातीय प्रेमी युगलाचा काल सायंकाळी 7 वाजता हुनुमान मंदिरामध्ये गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत लग्न लावून दिला
बोथली येथील युवक महेश श्रीराम नागपुरे वय 23 वर्षे आणि युवती शिवानी दिनकर सुकारे वय 20 वर्षे नागभीड तालुक्यातील कोजबी येथील रहिवाशी असून मागील 2 वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू होते या दोघांच्या प्रेमला सुरवात एकमेकांनच्या कोजबी गावात भेटी दरम्यान झाले महेश हा कोजबी येथील आत्याच्या घरी भेटायला जायचा नेहमीच आत्याकडे जाण्यामुळे त्याची ओळख शिवानी सोबत झाली ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि आपण प्रेमात पडलो हे त्यांच्या लक्षात आले नाही तेव्हा लपून छपून यांचे प्रेम चांगले बहरत होते एकमेकांनशिवाय ते दोघेही राहू शकत नव्हते त्यामुळे त्यांच्या भेटी गाठी वाढल्या आणि यांची प्रेमाची चुनक शिवाणीच्या घरच्यांना लागली त्यामुळे त्यांनी शिवणीचे लग्न करण्याचे ठरविले घरच्यांनी जबरदस्तीने एक स्थळ पाहून लग्न लावून दिले परंतु म्हणतात ना, प्रेम आंधळे असते तिथे सुद्धा शिवाणीचे मन रमले नाही कारण ती महेश च्या प्रेमात आकंठ बुडाली होती त्यामुळे अवघे तीन महिन्यानंतर तिने ते घर सोडले आणि सरळ महेश च्या घरचा रस्ता पकडला घरी येताच तिने सर्व सांगून मी आता परत जाणार नाही माझे जीवन मरण याच घरात होणार असे महेश च्या कुटूंबाला सांगितले महेश आणि कुटूंबियांनी तात्काळ दखल घेत महेश आणि शिवणीचे प्रेम प्रकरण तिच्या सासरच्या मंडळी ला सांगून त्यांच्या प्रेमात अडसर होऊ नका नाहीतर ते दोघे पुन्हा या जीवनात दिसणार नाहीत अशी विनंती केली असता त्यांनी तात्काळ त्यांच्या लग्नाला परवानगी देऊन शिवणीला सोडचिठ्ठी दिली कायदेशीर सर्व बाबी करून तिला मुक्त केले त्यामुळे गावकऱ्यांनी महेश आणि शिवणीचे पारंपारिक पद्धतीने हुनुमान मंदिर परिसरात सर्व कुटूंबियांच्या समक्ष काल रात्री 7 वाजता विधी पूर्वक हिंदू पद्धतीने लग्न लावून दिले
यावेळी लग्नाला गावाचे सरपंच मनोहर चौधरी,सौ नमिता पाटील ग्रा प सदस्य,तानाजी सहारे माजी उपसरपंच प्यारेखा पठाण प्रताप नागपुरे अण्णाजी सहारे विनोद ढोणे आदींसह गावातील सर्व जेष्ठ मंडळी महिला पुरुष बालगोपाल या लग्न कार्याला उपस्थित होते
