सोनेगाव वासीयांनी रोखून धरले एस आर के कंपनीचे ट्रक........
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भूतकर मो.न.8308264808
शेगाव बु येथून जवळ असलेल्या सोनेगाव येथे अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन व वाहतूक चालू असताना गावकऱ्यांनी अडविले एस.आर.के. कंपनीचे हायवा ट्रक. सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की मौजा सोनेगाव येथील बुरान यांच्या शेतामध्ये एस.आर.के.कंपनीने मुरमाची उत्खनन करून सदर मुरूम ट्रकच्या सहाय्याने वरोरा चिमूर हायवे नॅशनल हायवे 353 रोडच्या कामासाठी वापरकरीत असल्यामुळे आणि वाहतूक सोनेगाव या गावांमधून होत असल्यामुळे सदर ग्रामपंचायतची कुठलीही परवानगी न घेता एस.आर.के. कंपनीने उत्खनन चालवले होते. कंपनीचे भरधाव ट्रक गावातून जात असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही तसेच अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे गावकऱ्यांनी सदर कंपनीचे ट्रक, 2 पोकलेन,1 जेसीबी, रोखून धरली व वरोरा तहसीलदार यांना फोनद्वारे माहिती देण्यात आली त्यामुळे सदर उत्खनन थांबवुन माननीय तहसीलदार यांच्या आदेशाप्रमाणे मोका पंचनामा मंडळ अधिकारी विलास काळे व तलाठी के.जी.तूराडे यांनी पूर्ण करून सदर वाहन पोलिस स्टेशन शेगाव बु येथे जमा करण्याचे आदेश दिले आहे. एस. आर. के. कंपनीचे ट्रक अडविण्यासाठी सोनेगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष मोहन महादेव किनाके, संजय वासुदेव खारकर, रेखा लाल ठाकरे, अविनाश खिरडकर,आणि गावकरी एकत्रित झाले होते....