लोकमान्य महाविद्यालयात कोविड-१९ च्या लसीकरनाला विद्यार्थ्यांचा उस्फुर्थ प्रतिसाद
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा येथील स्थानिक लोकमान्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना,विद्यार्थी विकास विभाग , उपजिल्हा रुग्णालय , वरोरा आणि मिशन युवा स्वास्थ अंतर्गत दिनांक २९ ऑक्टोबर २०२१ रोजी एक दिवसीय कोविड-१९ लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुबोध कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सुबोध कुमार सिंह यांनी या शिबिराच्या आयोजनामागची भूमिका आणि लसीकरणाचे महत्त्व आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. या शिबिरात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लस घ्यावी यासाठी महाविद्यालय स्तरावर प्रयत्न करण्यात आला.या शिबिराच्या यशस्वीतेसाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथील डॉ. सुजाता काटकर, श्री.येडे, पिंपळशेंडे मॅडम, श्री. अमोल भोंग यांचे मार्गदर्शन लाभले.या लसीकरण शिबिरात ५० विद्यार्थ्यानी लस घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा. तानाजी माने तर आभार महाविद्यालयातील नोडल अधिकारी डॉ. लोणकर यांनी केले.
लसीकरण शिबिराकरीता महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक इत्यादींचे सहकार्य लाभले.