ब्रेकिंग:-वनरक्षक महिलेलाच पट्टेदार वाघाने भर जंगलात ओढत घेऊन जात ठार केले

ब्रेकिंग:-वनरक्षक महिलेलाच पट्टेदार वाघाने भर जंगलात ओढत घेऊन जात ठार केले

कोलारा  गेट परिसरातील घटना

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी 

प्रवीण वाघे


चंद्रपूर जिल्ह्यातील   चिमूर तालुक्यातील कोलारा कोअर वनपरीक्षेत्रातील वाघाई पानवटा क्रमांक 97 येथे महिला वनरक्षक स्वाती नानाजी ढुमने वय 32 वर्ष ह्या सकाळी 8:30च्या दरम्यान ट्रॅनसेक्त लाईनची कामे करीत असताना  वाघाच्या हल्ल्यात वनरक्षक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे 

                कोलारा वनपरिक्षेत्र कार्यालय(कोअर) येथे कार्यारत महिला वनरक्षक स्वाती ढुमने हया तीन सहकारी वनरक्षकासह वन क्षेत्रात आज सकाळी 8:30 वाजता   दिनांक  20 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या ट्रॅनसेक्त  लाईनचे काम करण्याकरिता गेले .कोलारा गेट पासून जवळपास 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगल क्षेत्रातील वाघाई चौरस्ता नजीक पाणवठा क्रमांक 97 जवळ काम करीत असलेल्या वनरक्षक  स्वाती ढुमने यांचेवर अचानक हल्ला केला सहकाऱ्यांना समजन्यापूर्वी फरपटत नेले  यात  महिला वनरक्षकाचा  जागेवरच मृत्यू झाला यांची माहिती वरिष्ठ अधिकारी यांना देण्यात आली यानंतर मृतक  वनरक्षकाच्या  प्रेताचा शोध घेण्यात आला प्रेत मिळाले असून  पंचनामा करून उत्तरीय  तपासणी करिता  उप जिल्हा रुग्णालयात चिमूर येथे पाठविण्यात आले  घटना स्थळावर  ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक   रामगावकर , उपसंचालक कोअर  एन वि काळे ,सहायय्यक वनरक्षक म वि खोरे ,ताडोबा वन परीक्षेत्र  अधिकारी एस के शेंडे,  इ वन वनाधिकारी घटना स्थरावर  पोहचून पाहणी केली .

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler