अन... अस्वलंच बिऱ्हाड पाठीवर

अन... अस्वलंच बिऱ्हाड पाठीवर

मदनापूर, बेलारा, पळसगाव शेतशिवारात अस्वल निघाली पिल्लाना घेऊन फिरायला

प्रतिनीधी- प्रवीण वाघे

तिकडे अस्वल, इकडे बळीराजा...! खरच बळीराजा...राजा आहे...!




   वाघ, बिबट, अस्वल म्हटलं की अंगावर काटा येतो. भितीने गर्भगळीत होण्याची स्थिती ओढावते. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील बळीराजा वाघ, बिबट, अस्वल या हिस्त्रपशुंचा सोबतीने शेती कसतो आहे. वाघ, बिबट, अस्वल यांच्या आमनासामना बळीराजाशी नेहमीच होत असतो. मात्र त्या हि परिस्थिती बळीराजा शेतातील कामे करून शेती कसत असल्याचे चित्र चिमुर तालुक्यातील पळसगाव, मदनापूर, विहिरगाव येथील शेतशीवारात अस्वल आणि तिच्या दोन पिल्यानी धुमाकुळ घातला आहे. काही अंतरावर अस्वलसह तीचे दोन पिल्ले असतांना बळीराजा मात्र नेहमी प्रमाणे शेतातील कामात गुंतलेला आहे. असे म्हणतात की जंगलाचा राजा वाघ आहे. मात्र या वाघाच्या नजरेला नजर भिडवून शेतात उभा राहून वाघ, बिबट, अस्वल असूनही कसलीही भिती न बाळगता शेतातील उभा असलेला खरा वाघ मात्र हा बळीराजाच ठरला आहे.

       चिमूर तालुक्यातील जगप्रसिद्ध ताडोबातील वन्यप्राण्यांची किमयाच न्यारी, जगप्रसिद्ध ताडोबात अनेक वन्यप्राणी आपली किमया देश विदेशातील पर्यटकांना दाखवित असून, कोणत्या ना कोणत्या कारणाने जंगलात व शेतशिवारात अनेक पर्यटकांना पहायला मिळत असते. 

   आज सकाळच्या सुमारास वडसी जंगलात असलेल्या शेतशिवारात एक अस्वल फिरत असतांना आपल्या दोन पिल्लाना पाठीवर बिऱ्हाड घेऊन मनमोकळेपणाने फिरत होती. या अस्वलीने मागील दोन दिवसांपासून आपल्या दोन पिल्ल्याना घेऊन मदनापूर, विहिरगाव वडसी परिसरात ठिय्या मांडून असल्याने परिसरातील शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱयांनी शेतात काम करणे बंद केले असून, त्या परिसरात वनविभागाचे कर्मचारी पहारा देत आहेत. अस्वल असलेल्या ठिकाणच्या परिसरात अस्वलाने आपले  बिऱ्हाड पाठीवर मांडुन फिरत असतांना दिसुन येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler