बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र डोईफोडे
चिखली :- लोकशाहि मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटिल, प्रदेश उपाध्यक्ष अमोल पाटिल व विदर्भ प्रभारी दशरथ सुरडकर यांनी दिलेल्या आदेशावरुन लोकशाही मराठी पत्रकार संघ चिखली तालुक्याच्या वतीने मौजे एकलारा येथे संजय गाधी निराधार योजना, राशन कार्ड, बांधकाम मजुर योजना व समाज कल्याण विभागाच्या विविध योजनेच्या वंचित लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी मार्गदर्शन मेळावा आयोजीत करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश बरबडे जिल्हा अध्यक्ष मनसे, उद् घाटक लक्ष्मण अंभोरे माजी सभापती प.स. चिखली तर प्रमुख मार्गदर्शक समाधान सुपेकर अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना,राजेश गवई सदस्य समाज कल्याण दक्षता समिती बुलडाणा, प्रशांतभैया डोंगरदिवे जिल्हा अध्यक्ष, सौ आशाताई कस्तुरे तालुका अध्यक्षा राष्टवादी सामाजीक न्याय विभाग,तसेच प्रमुख उपस्थीती राजेश परीहार जिल्हा उपाध्यक्ष मनसे, गजानन अंभोरे सरपंच पती,राजेश म्हस्के राष्टवादि नेते,अॅड मनमोहन घेवंदे
प्रशासक कृ उ. बाजार समिती,शेख गुलाब भाई सामाजिक कार्यकर्ते,अॅड दिनेश जपे सामाजीक कार्यकर्ते,विजय लंके
सामाजिक कार्यकर्ते,समाधान म्हस्के सामाजिक कार्यकर्ते,संदीप नरवडे, कल्पनाताई केजकर, चंद्रशेखर काळे, रवि मगर यांच्या उपस्थीतीत संपन्न झाला.
यावेळी जनसामान्यांना संजय गांधी निराधार योजनेत येणार्या सर्व अडीअचनी सोडवुन न्याय देणार असल्याचे मत समाधान सुपेकर यांनी केले. तसेच अनुसूचित जाती जमाती कायदयासंदर्भात सखोल असे मार्गदर्शन करुन समाज कल्याणच्या विवीध योजनेचा लाभ तळागळातिल घटकापर्यंत पोहचवणार असे मत राजेश गवई यांनी व्यक्त केले. तर शासकीय योजनेसाठी लागणारे कागदपत्रे पुर्ण करुन आमच्याशी सपर्क साधण्याचे आवाहन गणेश बरबडे यांनी केले.
यावेळी सत्तर ते अंशी लाभार्थांच्या अडचणी जाणुन घेऊन त्या तात्काळ सोडविण्याचे आश्वासन सर्व मान्यवरांनी केले. सदर कार्यक्रमाचे आयोजक पत्रकार शेख अजहर, लोकशाहि मराठी पत्रकार संघाचे तालूका कोषाध्यक्ष यांनी केले होते. यावेळी गावातील शेकडो नागरीक उपस्थीत होते.