प्रहारच्या विरुगिरी आंदोलनाने नेरी वाशियाना मिळाले शुद्ध पाणी

प्रहारच्या विरुगिरी आंदोलनाने नेरी वाशियाना मिळाले शुद्ध पाणी

नेरी ग्रामपंचायत ने जे नाही केले ते प्रहार ने करून दाखवीले. ग्रामपंचायत हरली प्रहार संघटना जिंकली.

प्रहार संघटनेचे मानले आभार

जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर 

गणेश उराडे 8928860058



नेरी:-  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेतून मिळालेल्या पाणीपुरवठा योजना बांधकाम होऊन पूर्ण होऊनही मागील 3 वर्षांपासून पाणी पुरवठा न करताच शोभेची वास्तू म्हणून उभी होती गावात पाण्यासाठी हाहाकार होता।  तेव्हा नेरी ग्रामपंचायत नी संबंधीत विभागाला पत्र व वारोवार सुचना देऊन कुनीच लक्ष दिले नाही.तेव्हा प्रहार संघटनेने या गंभीर बाबीची दखल घेत पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी आंदोलन केले या आंदोलनाने प्रशासन हादरले तात्काळ सर्व प्रक्रिया पूर्ण करीत  पाणीपुरवठा सुरळीत सुरू होऊन प्रहार च्या आंदोलनाला यश प्राप्त होऊन नेरी वाशियाना शुद्ध पाणी   मिळाले

           चिमूर तालुक्यातील नेरी  सर्वात मोठे गाव असून सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे या गावाला नेहमी पाण्याची टंचाई निर्माण होत होती तेव्हा मागील 6 ते 7 वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या योजनेतून लाखो रुपयांची  पाणीपुरवठा योजना मंजूर झाली लगेच कामाला सुरुवात होऊन पाण्याची टाकी व जलशुद्धीकरण टाकीची निर्मिती करण्यात आली परंतु बांधकाम पूर्ण होऊनही पाणी पुरवठा न करता ती शोभेची वास्तू म्हणून उभी होती तसेच 2020 ला ग्रा प वर प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी गुंतीवार यांनी संगमताने ग्रा प सदस्य गावातील पुढारी याना बोलवून कुठलीही पाण्याची  टेस्टिंग न करता या योजनेचे ग्रा प ला हस्तांतरण केले परंतु दोन वर्षे होऊनही पाणी आला नाही ग्रा प आणि नागरिकांमध्ये पाण्यासाठी हमरीतुमरी होत होती सर्वत्र पाण्याची टंचाई निर्माण झाली तेव्हा नेरी ग्रामपंचायत नी संभदीत विभागाला पत्र व वारोवार सुचना दीली होती एवढच नाही तर आमदार बंटी  भागडीया या॓नी सुद्धा  जीवन प्राधीकरन विभागाला जानेवारी महीन्यामध्ये पत्र व्यवहार करुन मिटीग लावली होती.व नेरी ग्रामपंचायत ला 50 हजार रु विजबील भरायला सांगीतल होत.   व योजना चालु करन्याचे आदेश सुद्धा दिले होते. मात्र संबंधीत विभागाने कुठल्याही प्रकारच लक्ष न देता सर्वाना केराची टोपली दाखवीली तेव्हा.या बाबीची दखल घेत  प्रहार संघटनेने  घेऊन ग्रा प ला  पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी निवेदन दिले परंतु त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली तेव्हा प्रहार संघटनेने दि 28 एप्रिलला राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार सेवक प्रवीण वाघे शेरखान पठाण यांच्या नेतूत्वात पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी आंदोलन केले या आंदोलनाने प्रशासन हादरले आणि आठ दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत सुरू करण्याचे आश्वासन  ग्रा प व विस्तार अधिकारी तहसीलदार यांनी दिले लगेच दुसऱ्या  दिवशी 29 एप्रिलला ला  प्रशासनाने दखल घेत संबंधित पाणी पुरवठा योजनेचे अभियंता व कंत्राटदार यांनी पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली व पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करण्याचे आश्वासन दिले तसेच 1 मेला प्रहार सेवक प्रवीण वाघे यांनी नामदार राज्यमंत्री बच्चू कडू याना निवेदन व तक्रार दिली तेव्हा तात्काळ बच्चू कडू यांनी चंद्रपूर येतील संबंधित पाणीपुरवठा विभागाला दूरध्वनीवरून संपर्क साधून आठ दिवसात नेरी शहरातील पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचे आदेश दिले आणि दि 13 मेला पहिली टेस्टिंग करून पाणी पुरवठा सुरळित सुरू केले व पाणी पुरवठा करताना अनेक समस्या व अडचणी निर्माण झाल्या त्या सर्व दूर करून यशस्वी पाणीपुरवठा नियमित करून संपुर्ण गावात पाणी पूरवठा केला त्यामुळे पाण्याची टंचाई समाप्त होऊन जिकडेतिकडे पाणीच पाणी मिळू लागल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन नागरिकांनी प्रहार संघटनेचे आभार मानून त्यांनी केलेल्या आंदोलनामुळेच पाणी मिळाल्याची प्रसंशा करीत प्रहार सेवक प्रवीण वाघे याना शुभेच्छा देत आभार व्यक्त केला.व प्रवीण वाघे या॓नी आदोलनाला उपस्थित प्रहार सेवक व गावकरी यांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler