तब्बल चार वर्षानंतर गाजली आमसभा....
उमरेड तालुका प्रतिनिधी
मनोज चाचरकर 9970643453
लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्याला खडसावले....
उमरेड तालुका प्रतिनिधी :- पंचायत समितीची आमसभा सोमवारी दीनदयाल उपाध्याय नाट्य सभागृहात घेण्यात आली. यावेळी नागरिकांनी विविध खात्यातील अधिकाऱ्यावर रोष व्यक्त केला. महावितरणकडून होणारा खंडित वीज पुरवठा, विजेचे पोल,कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार, बी डी ओ कडून सरपंचांना व सदस्यांना मिळणारी वागणूक, धोकादायक इलेक्ट्रिक पोल वरील विद्युत तार बदलविले नसल्याने दुर्घटनेची शक्यता व्यक्त करत कामात सुधारणा करण्याची मागणी नागरिकांकडून व सरपंचाकडून करण्यात आली. रोजगार हमी योजनेत लाखो रुपयांची अफरातफर करण्यात आल्याचे लोकप्रतिनिधींना निदर्शनात आणून दिले. नरेगाच्या कामाचे प्रश्न तीन वर्षापासून प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधी अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. माझ्या शेतकऱ्याला अधिकारी त्रास देत असेल तर मी खपून घेणार नाही.असे यावेळी लोकप्रतिनिधी पारवे म्हणाले. यावेळी मंचावर आमदार राजू पारवे, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसीलदार संदीप पुडेकर,पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे,खंड विकास अधिकारी माने,जिल्हा परिषद सदस्य नेयमावली माटे, राजू सुटे,सुनीता ठाकरे,माधुरी गेडाम, पंचायत समिती सदस्य पुषकर डांगरे, प्रियंका लोखंडे, गीतांजली नागभीडकर, जयश्री देशमुख, मीनाक्षी कावटे,सभापती रमेश किलनाके,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रुपचंद कडू यावेळी उपस्थित होते.यासह विविध खात्याचे अधिकारी सरपंच ग्रामसेवक पटवारी प्रामुख्याने सभागृहात हजर होते सुरुवातीलाच खंड विकास अधिकारी माने हे सरपंच व सदस्य यांचा समस्या ऐकून घेत नाही.आणि वागणूक बरोबर देत नसल्याचा आरोप सरपंचांनी कडून करण्यात आला. सरपंच अश्विन उके, शिवदास कुकडकर हे बी डी ओ वर पेटल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. माने यांचा कडून उडवाउडवीची उत्तरे देण्याच्या प्रयत्न झाला. मात्र सरपंच यांनी त्यावर संताप व्यक्त केला.काही सरपंच यांना ग्रामपंचायत ला कामा करिता अनुदान मिळाल्याचे माहीतच नाही.कारण ग्रामसेवक यांनी सरपंच यांना सांगितलेच नाही.सायकी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खदानी पाच वर्षपासून बिना रॉयल्टी उतखंनंन करत असल्याचे महसूल विभागाच्या निर्दर्शनात सरपंच यांनी आणून दिले.
अधिकारी नसताना नायब तहसीलदार यांची ढवळाडवळ
अतिक्रमण नसतानाही नायब तहसीलदार यांनी शेतकऱ्याला तुझे अतिक्रमण आहे असे सांगून शेतकऱ्यास त्रास देत असल्याचे आरोप सरपंच संघटनेचे अध्यक्ष अश्विन उके यांनी आमसभेत वरपे यांचा वर करीत चांगलेच धारेवर धरले. मात्र वरपे म्हणाले तलाठयानी अहवाल पाठवीला त्या आधारावर निर्णय घेतला.उपविभागीय अधिकारी म्हणाले अधिकार क्षेत्रात नसताना अतिक्रमण दाखविले कसे.
