ब्रेकिंग-नेरी - जांभुळघाट रोडवर टाटा मॅझीक गाडी पलटी
२० हजारांचे नुकसान
प्रहार सेवक प्रवीण वाघे धावले मदतीला.
नेरी प्रतीनीधी - प्रवीण वाघे
नेरी वरून जवळ असलेल्या रामपुर जवळील मोडीवर टाटा मॅजीक गाडी पलटी झाली . यात चालक कीरकोळ जखमी झाला आहे .
सवीस्त वृत्त असे की , चिमूर तालुक्यातील नेरी - जांभुळघाट रोडवरील रामपुर जवळील वळनावर नागपुर येथुन येत असलेल्या पाणी बॉटल टाटा मॅझीक गाडी रस्त्याच्या अरूंद कामामुळे गाडी रस्त्याखाली उतरून पलटी झाली .यात असलेल्या पाणी बॉटल फुटल्या त्यामुळे येथील अंदाजे २० हजारांचे नुकसान झाले आहे . आणि चालक जॉन्टी तनुजे रा.नागपुर वय -२५ वर्ष हा कीरकोळ जखमी झाला आहे .ही गाडी नेरी येथे माल घेऊन येणार होती.गाडी क्रमांक एम.एच.४९ , ए.टी.५९३८ हा आहे . ही घटना सांयकाळी ६.३० वाजताची आहे .
या घटनेची माहीती होताच नेरी येथील प्रहार सेवक
प्रवीण वाघे हे घटनास्थळी जावून माणुसकीचे दर्शन देत चालकाला बाहेर काढुन पाणी पाजुन पुढील उपचारासाठी दवाखाण्यात नेले .
