देऊळगाव राजा ( ज्ञानेश्वर लाड) : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने देऊळगाव राजात उद्या शनिवारी ( दि .27 ) भरणारा आठवडे बाजार व गुरांचा बाजार रद्द करण्यात आला आहे . नगर परिषद प्रशासनातर्फे ही माहिती देण्यात आली . तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे . शहर व ग्रामीण भागामिळून आतापर्यंत २ ९ ४ रुग्ण आढळले आहेत . मागील आठवड्यातील शनिवारी आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती . त्यामुळे उद्या आठवडी बाजारच भरविण्यात येणार नाही . शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानेही बंद राहणार आहेत .
