संपादक: ज्ञानेश्वर लाड
लातूर : दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख व दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांची राजकारणातील जगावेगळी मैत्री आजरामर राहणार आहे . देशमुख यांच्या जिल्हा परिषदेतील पुतळ्याशेजारी मुंडे यांचा पुतळा उभारण्याच्या निर्णयाला सोमवारी ( ता . आठ ) जिल्हा परिषदेने चालना दिली . पुतळा उभारणीसाठी अर्थसंकल्पात साठ लाख रुपयांची भरीव तरतूद करताना दुसरीकडे रेणापूर पंचायत समितीच्या आवारात मुंडे यांचे स्मारक उभारण्याचाही निर्णय घेतला . या ठरावाला मंजूर करताना दुसरीकडे देशमुख यांच्या स्मृतीभवनासाठी लातूर पंचायत समिती सभापतींच्या निवासस्थानाची जागा सांस्कृतिक कार्य विभागाकडे हस्तांत्तरीत करण्याला सभेने मान्यता दिली .
