Maharashtra : राज्यात करोनाने गाठला नवा ' उच्चांक ' ; लॉकडाऊनची शक्यता बळावली


 संपादक: ज्ञानेश्वर लाड

मुंबई - राज्यात करोनाचा कहर सुरूच आहे . गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 27 हजार 126 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली असून 92 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे . तर 13 हजार 588 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत . आजच्या रुग्णसंख्येनंतर आता अॅक्टिव्ह रूग्णांचा आकडा दोन लाखांच्या जवळ पोहचला आहे . नागपूर , पुणे , मुंबई आणि ठाणे या शहरांत करोनाची सर्वाधिक रुग्णवाढ होत आहे . त्यामुळे या शहरांत आधीच करोनाबाबत कठोर नियम करण्यात आलेले आहेत . अशावेळी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यासाठी लॉकडाऊनसारखे कठोर आणि टोकाचे पाऊल उचलू शकतात , असे बोलले जात आहे . 

आज राज्यात 27,126 नवीन करोनाबाधित आढळले आहेतकरोना संसर्गाने महाराष्ट्रात शिरकाव केल्यापासून हा उच्चांकी आकडा आहे . नवीन रूग्ण वाढत असल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घसरत आहे . आज हे प्रमाण 89.97 टक्के एवढे आहे . राज्यात आज 92 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत करोनामुळे 53300 जणांचा बळी गेला आहे . सध्या राज्यातील मृत्यूदर 2.18 टक्के एवढा आहे . आतापर्यंत एकूण 22 लाख 3 हजार 553 जणांनी करोनावर मात केली आहे .

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler