*दोन दिवसापासुन बसस्थानक परिसर स्वच्छता मोहीम चालू आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अहमदपूर MSRTC वर प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव चा दणका*

 



दोन दिवसापासुन  बसस्थानक परिसर स्वच्छता मोहीम चालू आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अहमदपूर MSRTC वर प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव चा दणका* जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आगार प्रमुख यांना बसस्थानका मधील स्वच्छता ग्रहांची दुरुस्ती व महिला स्वच्छताला ग्रहाला दरवाजा बसवण्याची मागणी अन्यथा 1 एप्रिल 2021 रोजी आगार प्रमुख कार्यालय अहमदपूर ठिय्या आंदोलन करण्यात येणार होते तरी प्रहार च्या निवेदनाची दखल घेऊन उपस्थित आगार प्रमुख साहेब व वाहतूक निरिक्षक देशमुख साहेब यांनी किनगाव बसथानक परिसर स्वच्छ करण्यात आला,स्वच्छता ग्रहांची पाण्याने धुवून स्वच्छता करण्यात आली.JCB लावुन काटेरी झुडपे काढुन परिसर स्वच्छ करण्यात आला.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आगार प्रमुख अहमदपूर  कित्येक वर्षांपासून मोजे किनगाव येथील बसस्थानक  मधील स्वच्छता ग्रह पडण्याच्या मार्गावर आहे सर्वत्र दुर्गंध पसरला होता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, महिला स्वच्छतागृहांची दुरवस्था झालेली होती महिला स्वच्छता ग्रहाला दरवाजा नाही त्याबाबत निवेदन देण्यात आले होते, स्वच्छता ग्रह मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहे कधी पडेल सांगता येत नाही,बस स्थानका मधील फँन  मोडक्या अवस्थेत आहेत, स्वच्छता ग्रहांची दुर्गंधी सर्वत्र पसरली होती, किनगाव येथुन ये जा करणा-या शंभर पेक्षाही जास्त गाड्या आहेत, मोठ्या प्रमाणात प्रवासी येथुन प्रवास करतात, मुक्कामी काळात बस चालकाला व वाहकांना बसस्थानकात थांबावे लागते त्यांना मच्छराचा व दुर्गंधीचा सामना करावा लागत होता, वारंवार मागणी करूनही महामंडळ लक्ष देत नव्हते.तरी प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव च्या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ स्वच्छता ग्रहांची स्वच्छता करण्यात आली आणि बसथानक परिसर स्वच्छ करण्यात आला. प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे आगार प्रमुख अहमदपूर येथे 1/4/2021 रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार होते, असे निवेदन देण्यात आले.  किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले शाखा अध्यक्ष योगेश आमले, उपाध्यक्ष मोहसीन शेख, कार्यअध्यक्ष प्रकाश जोशी,कोषाध्यक्ष एजाज पठाण,सचिव दशरथ हैगले , प्रहार सेवक वैजनाथ सुनेवाड, दिनेश किनकर, विशाल चावरे,अनवर तांबोळी, वैजनाथ चाकाटे, विशाल चावरे, बालाजी पांचाळ,इम्रान पठाण, बबलू कुरेशी,भिमा भंडारे, गणेश बोडके,अक्षय क्षिरसागर, गोविंद आंधळे,गडकरी हनुमंत,सावता श्रृंगारे,ओम शेळके, सतिश पांचाळ, सुरेश सिध्देश्वरे, सतिश ठाकुर, रुतिक हुडगे अदिजण उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler