वाघाच्या हल्यात शेतकरी ठार चिमूर तालुक्यातील नेरी जवळील हरनी येथील घटना

 वाघाच्या हल्यात शेतकरी ठार चिमूर तालुक्यातील नेरी जवळील हरनी येथील घटना

 


 प्रतिनिधी :-प्रविण वाघे मो, 7038115037

दिनांक २६ जुन २०२१ रोजी चिमूर तालुक्यातील नेरी येथुन जवळच असलेल्या हरणी गावातील येथील शेतकरी शामरावजी डोमाजी नन्नावरे हे शेतात काम करत असतांना सांयकाळी ५ते ६ च्या सुमारास दबा धरून असलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला .

घटनेची माहिती होताच वनविभाग आणी पोलीस कर्मचारी तिथे पोहचले व पंचनामा करुण शव शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय चिमुर येथे पाठवीन्यात आले . वाघाच्या हल्यात एका शेेतकऱ्याचा जिव गेला त्यामुळे त्या हरनी परिसरातील  शेतकऱ्यांनमध्ये भितीचे वातावरन निर्माण झाले आहे. त्या वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी गावकर्यांकडुन मागणी होत आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler