उंद्री ग्रामपंचायत येथे शिवस्वराज्य दिन साजरा
विशाल गवई ता. प्रतिनिधी चिखली
70833 04124
महाराष्ट्र शासन निर्देशा प्रमाणे ग्रामपंचायत प्रांगणातील छत्रपती शिवरायांना युवक,प्रतिष्ठित व गावकरी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवराय पुतळ्यास माल्यर्पण करून ग्रापं कार्यालया वर प्रतीकात्मक शिवशक राजदंड च्या वर रयतेच्या झोळीत सार्वभौमत्व रिता करणारा सुवर्ण कलश पूजन करून शिवशक राजदंड स्वराज्य गुढी ग्रामपंचायत कार्यालय वर भाई प्रदीप अंभोरे सरपंच यांचे हस्ते उभारून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला
यावेळी गावचे भाई प्रदीप अंभोरे सरपंच संजय महाले माजी पंचायत समिती सदस्य मनोज लाहुडकर अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस कमिटी, सुरेश पुरोहित काँग्रेस नेते गणेश काळे सदस्य रफिक शेख सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस,गोपाल जगताप सदस्य जितेंद्र राऊत आकाश राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटना दिपक गिऱ्हे साहेब, अभिमान राऊत अमोल शिरसागर सागर ठाकरे नितीन लाहूडकर महादेव बऱ्हाटे नारायण दांदळे भगवान दांदडे त्र्यंबक राऊत देविदास महाले आदी प्रतिष्ठित व ग्रामपंचायत कर्मचारी सह अनेक गावकरी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रक दिनांक 1 जुन 2021 नुसार उंद्री येथे शिवस्वराज दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर ग्रापं प्रांगणात राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने सांगता करण्यात आली.
चिखली , उंद्री
