राज्यातील भूमिहीनांची कर्जमाक्ती भूमिहक्क व वन विभाग अन्याय नं थांबल्यास सामूहिक आत्मदहन:-भाई प्रदीप अंभोरे

राज्यातील भूमिहीनांची कर्जमाक्ती भूमिहक्क व वन विभाग अन्याय नं थांबल्यास  सामूहिक आत्मदहन:-भाई प्रदीप अंभोरे  

 विशाल गवई प्रतिनिधी चिखली  ता.                                            70833 04124



 बुलढाणा: - भूमी मुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चा या संघटनेच्या प्रमुख नेते कार्यकर्त्यांचे बैठकित भूमिहीन अतिक्रमण धारकांचे भूमीहक्क व सामाजिक न्याय तसेच शंभर टक्के कर्जमुक्ती व वन जमीन प्रलंबित दावेदांराना सन 2021-22 खरीप रब्बी हंगामी कृषीपिक उत्पादनं स्तव पेरणी व पूर्व मशागतीचे निर्देश द्यावेत आदी मागण्याची पूर्तता न  शासन प्रशासन जर करत नसेल तर शेतकरी बांधवांप्रमाणे स्वतः बलिदान करण्याचा निर्णय संयुक्त संघटनेच्या बैठकीत 26 जून 2021 सामाजिक न्याय दिनी मंत्रालयावर सामुहिक आत्मदहनाचा इशारा मा.ना.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तथा  सामाजिक न्यायमंत्री यांना जिल्हाधिकारी बुलडाणा द्वारा भाई प्रदीप अंभोरे संस्थापक भूमी मुक्ती मोर्चा महाराष्ट्र यांनी शिस्टमंडळ निवेदन द्वारे दिला 


बुलढाणा येथील सामाजिक न्याय भवनात गुरुवार दि ४ जून रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान संघटनेच्या प्रमुख कार्यकर्यांची भाई प्रदिप अंभोरे याचे मार्गदर्शना खाली व प्रदेशाध्यक्ष भाई लक्ष्मण ठोसरे याचे अध्यक्षते तं  बैठक घेण्यात आली  बुलढाणा जिला वनविभाग जिल्ह्यातील अतिक्रमण धारकांवर करीत असलेले अन्याय प्रलंबित विविध मागण्या स्तव जिल्हाधिकारी दालनात मा निवासी जिल्हाधीकारी, उप वनं संरक्षक, तथा उप जिल्हाधिकारी आदिवासी वनहक्क विभाग यांची शिस्ट मंडळ समवेत 1 तास बैठक अडचणी जाणून घेवून प्रश्न मार्गी लावण्याचे आस्वासन दिले  व पूर्तता त्वरित नं केल्यास मा मुख्यमंत्री यांना निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले या निवेदनात अतिक्रमण धारकांचे भूमिहक्क,व सामाजिक न्याय तसेच शंभर टक्के कर्ज मुक्ती करण्यात यावी तसेच प्रलंबित मागण्याची पूर्तता न झाल्यास संघटनेच्या संयुक्त संघटना दलित आदिवासी कार्यकर्त्यां कडून सामूहिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आला,या वेळी संस्थापक अध्यक्ष भाई प्रदिप अंभोरे,बहुजन मुक्ती मोर्चा या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भाई लक्ष्मण ठोसरे ,व भूमी मुक्ती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष भीमराव खरात,मराठवाडा प्रदेश अध्यक्ष भाई भगवान गवई,अमरावती विभागीय अध्यक्ष भाई मधुकर मिसाळ भाई रमेश गाडेकर,भाई शेषराव चव्हाण, प्रशांत सोनोने भाई अशोक इंगळे संदीप चेके सुभाष खेडेकर, शिवदास तयाडे दिपा पवार याचेसह जिल्ह्यातील सर्व तालुका नेते वा अन्यायग्रस्त अतिक्रमक व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.                                                                         

बुलढाणा

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler