अखेर प्रहाचे रुग्ण मीत्र जीवन तोगरे याच्या प्रयत्नाला यश*
जीवती तालुक्यातील टेकामांडवा प्राथमीक आरोग्य केद्राला डाॅ श्रद्धा माटुवार यांची नियुक्ती
प्रतिनीधी:-प्रविण वाघे, 7038115037
जीवती:- टेकामांडवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गावातील लोक शेळ्या मेंढ्या बांधत असल्याची तक्रार रुग्णसेवक जीवन तोगरे यांनी मा.आमदार सुभाष भाऊ धोटे यांना फोन व ई मेल द्वारे कळविले होते.पण या तक्रारीची योग्य ती दखल मा.सुभाष भाऊ धोटे यांनी घेतली नाही.तेंव्हा पहिल्यांदा सदर प्रकरणाची बातमी रुग्णसेवक जीवन तोगरे यांनी वर्तमान पत्रात दिली व सोबतच जिल्हा आरोग्य अधिकारी यांना फोन द्वारे कळविले.तेंव्हा लगेच जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा. परिषद.चंद्रपूर यांनी सदर प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ टेकामांडावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचा आदेश देऊन तिथे डॉ. श्रध्दा लक्ष्मण माटूरवार यांची नियुक्ती केली आहे. या आनंदाच्या बातमीमुळे गावकर्यांच्या मनात आनंदाचे वातावरण पसरले आहे,
हे सर्व प्रहारचे रुग्णसेवक जीवन तोगरे यांनी केलेल्या पाठपुराव्याची पावती आहे.असेही टेकामांडवा गावकर्यांनी मनले आहे, त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व प्रहार सेवकांनी जीवन तोगरे यांचे आभार मानले
