वणी-वरोरा मार्गावर अपघात
पीकअप वाहणाने दिली जोरदार धडक, दुचाकी स्वार जागीच ठार.
वणी तालुका प्रतिनिधी
अमोल बांगडे 9823787376
वणी -(4जून ):-पीकअप व दुचाकी वाहणाच्या अपघातात एक जन जागीच ठार झाल्याची घटना वणी वरोरा मार्गावर घडली
सविस्तर वृत असे आहे कि, निलेश नामदेव मिळमिले वय 32 वर्ष रा. भद्रावती असे मृतकाचे नाव आहे. निलेश मिलमिले यांच्या पत्नीचे गाव वणी तालुक्यातील कुरई येथील माहेर
आहे.
व बोमठाणा येथील सासर असून ती काही दिवसापासून माहेरी कुरई गावात आलेली होती.
परिणामी निलेश गुरुवारी 3जून रोजी बोमठाणा वरून सासुरवाडीला जाण्याकरिता त्याचा गाडी क्र. एम.एच. 29 बी जी.6129 ने सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान वणीकडे निघाला असता सावर्ला जवळ वणीकडून भरधाव वेगाने येत असलेल्या पिकअप वाहन क्र.एम एच. 29 बी ई.0238 ने जोरात धडक दिली.या अपघातात निलेश नामदेव मिलमिले यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती वणी पोलिसांना मिळताच वणी पोलीस घटनास्तळी पोहचले व पंचनामा करून मृत्यूदेह वणी येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आला असून पुढील तपास जमदार जगदीश बोरनारे करीत आहे.
