पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कडून ब्रम्हपुरी तालुक्यातील रुई,खरकाडा, किन्ही गावातील विविध घटनांमधील मृतकांच्या कुटुबियांना आर्थिक मदत

 पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कडून ब्रम्हपुरी तालुक्यातील रुई,खरकाडा, किन्ही गावातील विविध घटनांमधील मृतकांच्या कुटुबियांना आर्थिक मदत.

ब्रम्हपूरी तालूका प्रतिनिधि

मनोज अगळे

9765874115

 ब्रम्हपुरी तालुक्यातील रुई येथील सदाशिव प्रधान (वय ६५) वर्ष, खरकाडा येथील किशोर मेश्राम (वय ४० वर्ष), विनायक भन्नारे (वय ४५ वर्ष) हे विविध घटनांमध्ये मृत पावले होते. 

याची माहिती राज्याचे मदत,पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, बहुजन कल्याण मंत्री, तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांना कळताच त्यांनी सदर कुटुबियांना आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फतीने आर्थिक मदत पाठवली.


     सदर आर्थिक मदत देतांना ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, अण्णाजी ठाकरे रूई, किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष नानाजी तुपट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुरेश दर्वे, रुई येथील सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष उत्तम बनकर, खरकाडाचे माजी सरपंच रविंद्र ढोरे, किन्हीचे सरपंच धीरू धोंगडे, उपसरपंच आशिष प्रधान, माजी सरपंच पुंडलिक प्रधान, सोमेश्वर उपासे हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler