ब्रेकिंग न्यूज_ विज पडुन शेतकर्यांचा जागीच म्रुत्यु

 ब्रेकिंग न्यूज_  विज पडुन शेतकर्यांचा जागीच म्रुत्यु

कोरपना तालुक्यातील सोनुर्ली (वन) येथील घटना

__________________

प्रतिनीधी_ प्रविण वाघे मो, 7038115037

कोरपना:- कोरपना तालुक्यातील सोनुर्ली (वन) येथील रहिवासी कवडु बळीराम मोहुर्ले वय 45वर्ष हे शेतात काम करत होते सायंकाळच्या ५ वाजताच्या सुमारास अचानक पाऊस सुरु झाला त्यामुळे ते घरी  जायसाठी निघाले वाटेतच ६ वाजताच्या दरम्यान त्यांच्या वर वीज कोसळुन जागेवरच ठार झाले त्यांच्या सोबत बैल बंडीवर पंढरी पडवेकर हे सुद्धा होते मात्र ते जखमी अवस्थेत झाले असून त्यांनी गावात येऊन गावकर्यांना माहिती दिली त्वरीत नातेवाईक व गावकरी घटस्थळी पोहचले  पोलीस पाटील बोरकर व तलाठी गेडाम साहेब यांनी ताबडतोब पोलीसांना माहिती दिली असता पोलीस  घटस्थळी पोहचले पंचनामा करुन म्रुतदेह शवविच्छेदनासाठी कोरपना ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला म्रुतक कवडु बळीराम मोहुर्ले यांच्या माघे पत्नी, दोन मुले , असा बराच मोठा आप्तपरीवार आहे त्यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे पुढील तपास पोलीस करत आहे,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler