सोशल मिडीयावरून झालेल्या प्रेम विवाहाचा अंत, चारीत्र्यावर संशय घेत पतीने केली पत्नीची हत्या चिमूर तालुक्यातील मासळ येथील घटना

 सोशल मिडीयावरून झालेल्या प्रेम विवाहाचा अंत, चारीत्र्यावर संशय घेत पतीने केली पत्नीची हत्या चिमूर तालुक्यातील मासळ येथील घटना

प्रतिनीधी:-प्रविण वाघे, मो, 7038115037


चिमूर - दिड वर्षापूर्वी गोंदिया जिल्हायातील एका विधवा महिलेचे तालुक्यातील मासळ ( बु ) येथील व्यक्तीसी सोशल मिडीया वरून सुत जुळले होते, घरच्या मंडळीना विरोध करून तिने मासळ येथील तंटामुक्त समीतीच्या माध्यमातुन त्या व्यक्ती बरोबर प्रेमविवाह केला यातुन तिला एक मुलगी झाली ती आठ महीन्याची आहे मात्र पती शकेला असल्याने तिच्या चारीत्र्यावर संशय घेत होता संशयावरून मंगळवार ला रात्रो बारा वाजता पती पत्नी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले पतीने घरातील बाजुला पडुन असलेली काठी उचलुन पत्नीवर सपासप वार करून हत्या केली मृतक पत्नी चे नाव विशाखा दिक्षीत पाटील वय २९ वर्ष मासळ येथील रहीवासी आहे पोलीसांनी आरोपी पती दीक्षीत हरीदास पाटील वय ३९ वर्ष रा मासळ ( बु ) यांना अटक केली आहे.

       आरोपी दिक्षीत पाटील यांची मृतक पत्नी विशाखा ही तिसरी पत्नी आहे यापूर्वी आरोपीने विहीरगाव येथील व नागपूर येथील मुलींसी प्रेमविवाह करूनच लग्न केले होते मात्र आरोपी संशयी वृत्तीचा असल्याने या दोन्ही पत्नी जास्त काळ टिकल्या नाही यापैकी एकीची सोडचिठ्ठी झाल्याचे समजते दिड वर्षा पासुन मृतक विशाखा चा संसार वेलीवर फुलत असताना अधून मधुन पती पत्नी चे खटके उडायचे दरम्यान पतीच्या जाचाला संशय वृत्ती ला कंटाळून विशाखा एक महीन्याच्या मुलीला सोडुन गोंदिया येथे माहेरी गेली होती ती सात महीने सासरी आलीच नव्हती या संदर्भात पत्नी ने पती विरोधात पोलीसात तक्रार दिली असता आरोपीने पत्नी विशाखा मिसींग झाल्याची पोलीसात तक्रार दिली होती त्यानंतर पुन्हा विशाखा व दीक्षीत यांच्यात मोबाइल फोन वरून प्रेम कहानी सुरु झाली तब्बल सात महीन्यांनी पुन्हा आई वडीलांना न विचारता विशाखा परस्पर मासळ येथे सासरी आली होती आल्याला नुकतेच आठ दिवस झाले होते पुन्हा संसार वेलीवर फुलत असताना मंगळवार च्या मध्यरात्री बारा वाजता दोघांत संशयावरून कडाक्याचे भांडण झाले भांडण एवढे विकोपाला गेले की आरोपी पती दिक्षीत पाटील यांनी पत्नी विशाखा हीच्यावर बाजुला असलेल्या जाड काठीने सपासप वार करत तिची हत्या केली अखेर सोशल मिडीयावरून झालेल्या प्रेम विवाहाचा अंत झाला

         फिर्यादी प्रिया पाटील यांच्या तक्रारीवरून पोलीसांनी कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी पती दीक्षीत पाटील याला अटक केली मृतक विशाखा चे प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे आनन्यात आले यासंदर्भात आरोपी दीक्षीत पाटील याला पोलीसांनी चिमूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शुक्रवार पर्यत पीसीआर दिला आहे पुढील तपास पोलीस अधिक्षक साळवे अप्पर पोलीस अधीक्षक कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड पीएसआय गायकवाड निमगडे गजभिये गुट्टे मडावी खामनकर करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler