गरजूंना मिळतोय जॉय

 गरजूंना मिळतोय जॉय

मुंबई ( विश्वनाथ पंडित) 


जॉय म्हणजे आनंद व जॉय ऑफ गिविंग म्हणजे देण्यातला आनंद. इतरांना मदत करण्याचा आनंद, सध्या मुंबईतील जॉय सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना लॉकडाउन काळात किराणा किट,आरोग्य किट व जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे काम सातत्याने संस्था करीत आहे.मार्च २०२० लॉकडाउन सुरू झाला त्या काळापासून ते आजपर्यंत जवळपास सुमारे हजारभर गोरगरीब, गरजू कुटुंबाना किराणा किट देण्याच काम संस्थेतर्फे करण्यात येत असून आजही हे काम नियमितपणे सुरू असल्याचे जॉय चे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे सर यांनी संगितले. याआधी पण लॉक डाउन नव्हता तेव्हा संस्थेने पालघर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळा,   आदिवासी पाडे, वस्त्या, अनाथालय, वृद्धश्रम, दृष्टीहीन कुटुंब याना मदत केलेली आहे. एक सामजिक जाणीव ठेवून हिरवे सरांनी सुरू केलेल्या या संस्थेत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील डॉक्टर, शिक्षक, पत्रकार, उच्चपदस्थ अधिकारी व सेवानिवृत्त मान्यवर असे जवळपास २०० कार्यकर्ते काम करीत असून हे सर्वजण वेळप्रसंगी पदरमोड करुन संस्थेचे उपक्रम यशस्वी करीत असतात.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler