सायळा येथील राशनदु कानदारांची दादागिरी
राशनधारकां सोबत खालच्या भाषेत व्यवहार
तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा। समाधान बंगाळे
तालुक्यातील सायळा येथील राशन दुकानदारांची दादागिरी गावातील काही राशनधारक राशन आणण्यासाठी गावातील राशनदुकानात गेले असता राशनदुकानदार यांना गावातील राशनधारकांनी राशनवाटपाची पावती मागितल्याने राशन दुकानदार गावकऱ्यांवर भडकला व तुमच्या कडून काय होते करून घ्या माझे कोणीही काहीही वाकड करू शकत नाही. माझे वर पर्यंत सबंध आहे तुम्हाला काय करायचे करा असे दादागिरीच्या भाषेत राशन दुकानदार राशनधारकांना बोलत होता तर गावातील शत्रूगुण लंबे यांना तर तुझे राशन कार्ड यादी मधूनच नाव काढून टाकतो व तुझे राशनकार्ड स्थालांतर करतो अशी धमकी शासनमान्य परवानाधारक यांनी दिली व केंद्र शासनाच्या वतीने मोफत धान्यवाटप योजना सुरू करण्यात आली असून गोरगरिबांना मोफत राशन वाटप करण्यात आले. परंतु सायळा येथील परवानाधारक मोफत राशन वाटप करण्याऐवजी गोरगरिबां कडून अधिकचे पैसे घेऊन राशन वाटप करत असतात जाब विचारला असता माझ्या नादाला लागू नका नाही तर तुम्हाला यानंतर राशन देणार नाही अशी धमकी सुद्धा गरिबांना देत होता व सदर शासनमान्य परवानाधारक दुकानदार हा सायळा गावात राहत नसुन मेहकर याठिकाणी वास्तव्यात असतो. सायळा येथील रेशन वाटप हा दुकानदार महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसात गावात येऊन करतो. कुठल्याही प्रकारची पुर्वसुचना न देता रेशन वाटपाला सुरूवात करून जर दोन दिवसांत रेशन घेतले नाही तर उर्वरित व्यक्तीनां राशन देत नाही. सदर व्यक्ती मेहकर येथून शेवटच्या दोन दिवसात येवून ते पण सकाळी गावात न येता गावात दुपारी रेशन वाटप करत असतो. त्यामुळे गावात बरेच रेशन कार्ड धारक हजर नसतात. त्यामुळे जे हजर नाही त्यांना परवाना धारक दुकानदार राशन देत नाही उर्वरित राशन मार्केट मध्ये नेऊन विकत असल्याची बाब समोर आली आहे. याप्रकाराची माहिती मिळताच सरपंचपती संदीप लंबे यांनी तहसीलदार यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला व घडलेला सर्व प्रकार तहसीलदार यांना सांगितला व या अगोदर तहसीलदार यांना वारंवार निवेदन सुध्दा सरपंच व गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आले आहे. परंतु यावर कुठल्याच प्रकारची कारवाई न झाल्याने गावातील गावकऱ्यांनी आज रूद्र रूप धारण केले होते. सदर परवानाधारकाचा परवाना रद्द करून चौकशी करावी अशी आेरड गावकऱ्यांच्या वतीने निघत होती. सरपंच संदीप लंबे यांनी तहसील कार्यालयात संपर्क केला असता तहसील कार्यालयातून राशनपरवाना धारकांची चौकशी करण्यासाठी नायब तहसीलदार मुजोवर मॅडम व पुरवठा अधिकारी संदीप बंगाळे यांनी भेट देऊन शासनमान्य रेशन दुकानाची पाहणी करून चौकशी केली. परंतु गावातील अनेकांच्या समस्या असल्याकारणाने नायब तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांनी घरोघरी जाऊन गावकऱ्यांच्या तक्रारी लेखी स्वरूपात घेतल्या असून लवकरच राशनदुकानदार यांच्या वर योग्य कारवाई करण्यात येईल असे सांगितले. परंतु गावकऱ्यांच्या वतीने सदर परवानाधारकाचा परवाना रद्द करावा व गावातील महिला बचत गटांला द्या अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार जिल्हा पुरवठा अधिकारी यांना करण्यात आली. यावेळी गावातील सरपंच संदीप लंबे ग्रामपंचायत सदस्य गावकरी मोठ्या संख्येने गावातील महिला सुध्दा उपस्थित होत्या.
