नेरी_ जांबुळघाट _भीसी रस्त्याची दुर्दशा या रोडच कुणी वाली आहे का नियमित प्रवास करणाऱ्या नागरीकांचा प्रश्न*

 *नेरी_ जांबुळघाट _भीसी रस्त्याची दुर्दशा या रोडच कुणी वाली आहे का नियमित प्रवास करणाऱ्या नागरीकांचा प्रश्न*


प्रतिनीधी:-प्रविण वाघे,मो, 7038115037

नेरी_चिमुर:- गेल्या चार वर्षापासून जांबुळघाट ते भींसी १४ कि, मी, या रस्त्याला जागोजागी खड्डे पडलेले असुन अपघाताला आमंत्रण देत असल्याचे एकंतरीत दिसुन येते या मार्गावर बऱ्याच अपघाताच्या घटना सुद्धा घडल्या आहेत पावसाळ्याच्या दिवसात रस्ता संपूर्ण चिखलमय होतो त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची त्वरित दुरस्ती करावी अशी या नियमीत प्रवास करणार्या नागरीकांची मागणी आहे,


वेळोवेळी पेशंट तातडीने नागपूर ला मेडिकल ला घेऊन जायची असेल तर तो पेशंट जाता जाता प्रवासातच  गंभीर होते किंवा मॄत पावते . त्या घरचा मुख्य कर्ता करविताच गेला किंवा लाडालोभाचा एखाद्या  जिव गेला तर काय वाईट प्रसंग येतो त्यांच्यावर .हा रस्ता नेरी जांबुळघाट आज या नेरी - जांभुळघाट - भिसी या रोडचे खुप महत्व आहे

सिंदेवाही , नवरगांव व परिसरातील जनतेस नागपुर ला समंधीत रस्त्यावरील गावांना जाण्यासाठी एकमेव रस्ता आहे नेरी मार्गे जवळचा असुन महागड्या काळात पेट्रोल डिझेल वाचविण्याचे साधन आहे . नेत्यांना सदर रोडची परीस्थिती लोक प्रतिनीधी किंवा प्रशासनाला माहिती असुन सुद्धा दुर्लक्ष केल्या जात आहे असा आरोप या परीसरातील नागरीकांनी केला आहे स्वताला जायचे असेल तर चिमुरवरुन गुळगुळीत मार्गाचा अवलंब करतात . कमरेचे मनके तुटेस्तोपावतो , पोटातील आतडी खालीवर होई पावतो , स्व:तासह सहपरिवार प्रवास करावा लागतो . जिल्ह्याचे पालकमंत्री , आमदार , खासदार , जि. प. गटनेता , क्षेत्रात येणारे जि. प. सदस्य , पं. स. सदस्य , यापैकी या रस्त्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाहीत   सदर परिसरातील बहुतेक जनता शेती व्यवसायात असुन सध्या कोरोनाची महामारी चालु आहे. 

 तर पावसाळ्यात विषारी जिवजंतु चा वावर हा असतोच . कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे तज्ञांनी नुकतेच केले असुन तात्काळ केसेस नागपूरला रेफर करणे जरुरीचे असल्याने .  सदर परिसरातील व्यापारी बांधवांना नागपुर हे सोयीचे ठिकाण आहे .  परिसरातील जनता याच रोड चा वापर वर्षानुवर्षे करित आहेत जवळपास ५० ते ६० गावातील नागपुरला जान्याची रहदारी या रोडवर अवलंबून आहे करीता जांबुळघाट भीसी १४,कि,मी,रस्ताचे बांधकाम लवकरात लवकर  करावे अशी नियमित प्रवास करणाऱ्या  नागरीकांची मागणी आहे,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler