प्रा. डॉ. माणिक टिकरे यांचे निधन.
वणी तालुका प्रतिनिधी
अमोल बांगडे 9823787376
दि.05 / 06 / 2021
सविस्तर वृत्त ; मारेगाव, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. डॉ. माणिक टिकरे यांचे नागपूर येथील हॉस्पिटल मधे
दि. 4 जून रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
ते दैनिक तरुण भारत चे मारेगाव प्रतिनिधी होते या धक्कादायक घटनेनी संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
ते मनमिळावू स्वभावाचे
असल्याने त्यांचा लाखो चाहते वर्ग होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रा.डॉ. टीकरे त्यांच्या पश्चात एक पत्नी एक मुलगा व मुलगी असा मोठा आप्तपरिवार आहे .
