पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कडून चिमुर विधानसभा अंतर्गत येणाऱ्या ब्रम्हपुरी तालुक्यातील गावांमधील धोबी, न्हावी, बँड पथक यांना आर्थिक मदत

 पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कडून चिमुर विधानसभा अंतर्गत येणाऱ्या ब्रम्हपुरी तालुक्यातील गावांमधील धोबी, न्हावी, बँड पथक यांना आर्थिक मदत


महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमेटिच्या सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे वितरण

ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी

मनोज अंगळे 97658 74115

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने लाँकडाऊन केला आहे.त्यामुळे कष्टकरी व हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे रोजगार बुडाले. 

त्यामुळे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत,पुनर्वसन व बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांच्या वतीने चिमुर विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या ब्रम्हपुरी तालुक्यातील गावांमधील सलुनधारक न्हावी, धोबी, चप्पल जोडे शिवण्याचे काम करणारे, बँड वाजवणारे अशा नागरिकांना आर्थिक सहाय्य करण्यात आले.

सदरची आर्थिक मदत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमेटिच्या सरचिटणीस शिवानीताई विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते ब्रम्हपुरी येथील शासकीय विश्रामगृहाच्या पटांगणात वितरित करण्यात आली.

            यावेळी ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटिचे तालुकाध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमेटिचे कार्याध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रभाकर सेलोकर, नगरपरीषद गटनेता तथा बांधकाम सभापती विलास विखार, जि.प.सदस्य डॉ. राजेश कांबळे, चिमुर विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष काशिनाथ खरकाटे गुरूजी, जि.प.सदस्या स्मिताताई पारधी, सदस्य प.स.ब्रम्हपुरी तथा प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रम्हपुरी थानेश्वर कायरकर, नगरसेवक डॉ नितीन उराडे, नगरसेवक महेश भर्रे, ब्रम्हपुरी शहर काँग्रेस कमेटिचे अध्यक्ष तथा नगरसेवक हितेंद्र राऊत, महिला काँग्रेस कमेटि तालुकाध्यक्ष मंगला लोनबले, कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रम्हपुरी प्रशासक वामन मिसार, मुन्ना रामटेके, रामरावजी चव्हाण, सोमेश्वर उपासे, माजी सरपंच राजेश पारधी, गुड्डु बगमारे, अमोल सलामे, हेमंत सेलोकर हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler