ब्रम्हपूरी पंचायत समिती मध्ये शिवराज्याभिषेक सोहळा "शिव स्वराज्य दिन" म्हणून साजरा
ब्रम्हपूरी तालुका प्रतिनिधी मनोज अगडे 97658 74115
.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा ६ जुन १६७४ रोजी रायगडावर झाला. दरवर्षी ६ जुन रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो मात्र या वर्षी या शिवराज्याभिषेक सोहळ्याला एक खास गोष्ट असुन ६ जुन हा दिवस संपुर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये *"शिवस्वराज दिन"* म्हणून साजरा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे निर्देश दिले होते.त्यानुसार पंचायत समिती ब्रम्हपुरी येथे आज दि.६ जुन २०२१ ला सकाळी ९ वाजता *"शिवस्वराज दिन"* साजरा करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सभापती रामलाल दोनाडकर, पंचायत समिती उपसभापती सौ. सुनिताताई ठवकर, पंचायत समिती सदस्य थानेश्वर कायरकर, पंचायत समिती सदस्य, प्रकाश नन्नावरे, पंचायत समिती सदस्या सुनंदाताई ढोरे, पंचायत समिती संवर्ग विकास अधिकारी डॉ शिरीष रामटेके, गटशिक्षणाधिकारी चिलमवार, विस्तार अधिकारी घुबडे, विस्तार अधिकारी राऊत. विस्तार अधिकारी खुळशिंगे, विस्तार अधिकारी खुणे, विस्तार अधिकारी शेळके, आदी सह पंचायत समिती कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते ब्रह्मपुरी
.
