यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौकात गोळीबार एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

 June 23, 2021

यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौकात गोळीबार एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी.


 *यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

 *अमोल बागडे 9823787376

यवतमाळ  :  यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौकात रेती तस्कर अक्षय राठोड टोळीचा सदस्य असलेल्या करण परोपटेवर अज्ञात दोन ते तीन जणांनी गोळीबार करून व धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केले उपचारासाठी.  रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.



 

यवतमाळ शहरातील  स्टेट बँक चौकात असलेल्या चौकामध्ये करण आला असता मागावर असलेल्या तीन ते चार जणांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार व धारदार शस्त्राने हल्ला चढविला. त्याच्या छातीमध्ये व पोटात चार गोळ्या लागल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. हल्ल्यात करण परोपटेचा मृत्यू झाला.


 

तर एक अग्नी शत्रातील निघालेली एक गोली पायात लागल्याने त्यालाही रूग्णालयात भरती करण्यात आले. हा हल्ला रेतीघाट तस्करी याच्यावरून झाल्याचे परिसरात चर्चा आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप शिरस्कर वडगाव पोलीस ठाण्याचे मनोज केदारे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला घटनास्थळावरून चार काडतुस पोलिसांनी जप्त केली. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके पाठविण्यात   आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler