थरारक : पोंभुर्णा तालुक्यात अस्वलीने केला नागरिकांवर हल्ला, 4 जण गंभीर जखमी

थरारक : पोंभुर्णा तालुक्यात अस्वलीने केला नागरिकांवर हल्ला, 4 जण गंभीर जखमी


चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी

प्रविण वाघे, 7038115037





पोंभुर्णा :- मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चिचपल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सातारा तुकुम येथील कक्ष क्रमांक-436, कक्ष क्रमांक-435 येथे गुराख्यानी आपआपले गुरे चरायला नेले असता दाट जंगलात दबा धरुन बसलेल्या अस्वलाने अचानकपणे हल्ला केला.

एकाच दिवशी दोन ठिकाणी अस्वलीच्या हल्ल्यात 4 नागरिक गंभीर जखमी झाले.


पहिल्या घटनेत सातारा तुकुम कक्ष क्रमांक-436 येथे गुरे चारणार्‍या 57 वर्षीय आणि 54 वर्षीय नागरिक अस्वलाच्या हल्लात गंभीर जखमी झाले. तर दुसऱ्या घटनेत सातारा तुकुम कक्ष क्रमांक -435 (FDCM) येथे गुरे चारणार्‍या 45 वर्षीय आणि 32 वर्षीय नागरिक अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झाले. हि घटना शनिवारी 3 जुलै ला 1 वाजताच्या सुमारास घडली.


सातारा तुकुम येथील विलास तुकाराम पेंदोर वय 54 वर्ष, सीताराम किसन मडावी वय 57 वर्ष यांनी कक्ष क्रमांक-436 नेहमी गुरे जंगलात चरण्याकरीता नेत असतात मात्र 3 जुलै ला दाट जंगलात दबा धरुन बसलेल्या अस्वलाच्या केलेल्या हल्यात गंभीर जखमी झाले.

तर दुसऱ्या घटनेत सातारा तुकुम येथील प्रफुल रघुनाथ सिडाम वय- 45 रा. सातारा तुकुम, रुपेश गजानन कुळमेथे वय. 32 रा.भानसी ता. सावली यांनी सातारा तुकुम कक्ष क्रमांक-435 (FDCM) गुरे जंगलात चारण्याकरीता नेले असता दाट जंगलात दबा धरुन बसलेल्या अस्वलाच्या हल्यात जखमी झाले.


सदर घटनेची माहिती वनविभागास मिळाली असता वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. ४ जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. गंभीर जखमी विलास तुकाराम पेंदोर यांच्या कुटुंबांना वनविभाग कर्मचारी मडावी यांचे कडून आर्थिक मदत देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler