अपंगांचे दैवत ना.राज्यमंञी बच्चू भाऊ कडू यांनी अपंग गायञीला दिला जगण्याचा आधार ...

 अपंगांचे दैवत ना.राज्यमंञी बच्चू भाऊ कडू यांनी अपंग गायञीला दिला जगण्याचा आधार ...

तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा

समाधान बंगाळे। 93565 67231

                                                                                                                                            गायत्री चंद्रशेखर निहाटकर, ही जन्मतःच दोन्ही हाताचे पंजे नसलेली, अत्यंत गरीब कुटुंबातील, अपंग युवती. 100 टक्के अपंग असून देखील जगण्याची व काहीतरी करून दाखविण्याची उमेद मनात होती, त्या धडपडीतूनच गायत्रीने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. परंतु उर्वरित आयुष्य सन्मानाने व स्वावलंबी होऊन जगता यावे, यासाठी गायत्रीचा संघर्ष सुरू होता, त्यासाठी तिने अनेकदा शासनाकडे नोकरी साठी साकडे घातले, परंतू यश आले नाही, त्यामुळे ती खचून गेली होती. 

अत्यंत हलाखीचे जिणे जगत असताना, मदत करणे तर दूरच, परंतु साधी विचारपूस करायला देखील, धर्माचे ठेकेदार म्हणून घेणारे कुठलेही महाभाग पुढे आले नाहीत.

गायत्री ची कहाणी मा ना बच्चूभाऊ कडू यांना सोशल मीडिया च्या माध्यमातून कळली. त्यांनी तिला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदतीचे आश्वासन दिले.  

ना बच्चूभाऊ यांनी कु गायत्री हिला, आपल्या अधिकारांचा वापर करून, ती रहात असलेल्या, कुटासा, ता अकोट, ह्या गावात तिला "सेतू" (सामूहिक सुविधा केंद्र ) मंजूर करून दिले. त्यासाठी लागणारे, संगणक, प्रिंटर, इंटरनेट इत्यादी व्यवस्था स्वतः करून दिली. आज कु गायत्रीने स्वतः चे शासनमान्य सेतू केंद्र सुरू करून, सन्मानाचे व स्वावलंबी जीवन सुरू केले आहे .

गायत्रीशी बोलताना तिच्या व कुटुंबियांच्या शब्दा शब्दातून मा. बच्चूभाऊ यांचे विषयीचे प्रेम, आपुलकी व कृतज्ञता आणि आभार व्यक्त होत होती. आज अश्या कितीतरी गायत्री व अपंग व्यक्ती यांचे जीवनात, मा बच्चूभाऊ यांनी आनंद फुलविला आहे, म्हणूनच तर बच्चूभाऊ यांना अपंगांचे दैवत म्हणतात. अपंग गायञीला रोजगाराच्या माध्यमातून बच्यु भाऊंनी जगण्याचा आधार दिल्यामुळे भाऊंच्या या अप्रतिम कार्याचे कौतुक महाराष्ट्रातील सर्व अपंग बांधवांनी केले आहे.





टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler