दि.२३ जुन २०२१चा ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय तातडीने रद्द करा.
ब्रम्हपुरी/ता.प्र दि.2 जुलै २०२१.
*मनोज अगळे 9765874115
१५वा वित्त आयोग अनुदानातून ग्रामपंचायतींना पथदिवे व पाणीपुरवठा योजनेचे विज बिल भरण्या बाबतचा २३ जून २०२१ चा ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय अत्यंत चुकीचा असून ग्रामपंचायतीवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे सदर शासन निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा अशी पंचायत समिती सभापती रामलाल दोनाडकर,पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर, पंचायत समिती सदस्य प्रकाश नन्नावरे, व ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व सरपंचानी यांनी केली आहे.
ग्रामपंचायतींना रस्ते, जोड रस्ते, सांडपाणी निचरा,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, नाली बांधकाम ग्रामपंचायतीच्या विकासासाठी आवश्यक साहित्य सामग्री, इत्यादी विकासात्मक कामांकरिता १५ वा वित्त आयोगाच्या अंतर्गत अनुदान प्राप्त होत असते. या अनुदानातून ग्रामपंचायतींना गावात अनेक विकास कामे करण्यासाठी निधी उपलब्ध होत असते. परंतु ग्रामविकास विभागाच्या सदर निर्णयाने १५व्या वित्त आयोगाच्या मिळणाऱ्या अनुदानातून गावातील पथदिवे व पाण्याच्या योजनांचे वीजबिल तातडीने भरणा करण्यात यावे असे आदेशित केले आहे. या निर्णयाचा ग्रामपंचायतीच्या विकास कामावर विपरीत परिणाम होणार असून राज्य सरकार पथदिवे व पाणी पुरवठा योजनांच्या विजबिला साठी निधी उपलब्ध करून द्यावे. असे जीआर काढणे अत्यंत चुकीचे असून ग्रामपंचायतींना मिळणारा विकासाचा निधी अन्य कामात वापर करून घेणे योग्य नाही. त्यामुळे सदर शासन निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा अशी मागणी ब्रम्हपूरी पंचायत समिती सभापती रामलाल दोनाडकर, पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर, पंचायत समिती सदस्य प्रकाश नन्नावरे,व ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व सरपंचानी यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे, यांना उपविभाग अधिकारी मार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.