नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात हत्तीरोग सार्वत्रिकीकरण मोहिमेचा शुभारंभ
चंद्रपूर-जिल्हा:-प्रतिनीधी
प्रवीण वाघे नेरी
7038115037
चिमूर_ नेरी:-। नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आज दि 1जुलै ला मनोज मामीडवार तसेच वैद्यकीय अधिकारी आशा ताई आणि सर्व कर्मचारी वृंद याना हत्तीरोग दुरीकरणासाठी गोळ्या प्रत्यक्ष खायला देऊन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला ही मोहीम 1 ते 15 जुलैपर्यंत 24 गावामध्ये राबविण्यात येणार असून हत्ती रोगाला दूर सारण्यासाठी राबविण्यात येणार आहे
दरवर्षी राज्याचे आरोग्य विभाग हत्ती रोगाला समूळ नष्ट करण्यासाठी हत्तीरोग दुरीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्फतीने गोळ्या वितरित करीत असते या वर्षी आजपासून गोळ्या वितरणाच्या कार्याला सुरवात झाली असून प्राथमिक आरोग्य कक्षातील 24 गावांना आशा ताईच्या मार्फतीने 29214 पात्र लाभार्थ्यांना गोळ्या वितरित करण्यात येणार आहे
सदर हत्ती रोग सार्वत्रिकीकरण शुभारंभ मोहिमेला नेरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ महेश मगर डॉ चेतन धोंगडे आरोग्य सहाय्यक भोयर आरोग्य साहाय्यीका अजानी डॉ सतीश वाघे कु मनीषा बनकर आरोग्य सेवक निखाडे ,ठाकरे, मसराम आरोग्य सेविका पंधरे ,चांदेकर,पारसिवे तसेच तीवरखेडे गिलबले आणि सर्व कर्मचारी वृंद आशाताई उपस्थित होत्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी या हत्तीरोग दुरीकरणाच्या गोळ्या सर्वांनी गांभीर्याने अवश्य खाव्या असे आवाहन मनोज मामीडवार यांनी या कार्यक्रमाप्रसंगी केले आहे

