दोन वर्षाच्या छोट्या मुलाच्या हातावर झाली यशस्वी शस्त्रक्रिया
उमरेड तालुका प्रतिनिधी
आशु लामसोगे 8855034555
सील्ली येथील शुभम भिवगडे यांचा दोन वर्षाचा मुलगा रिदम हा घरी खेळत असताना पडला आणि त्याच्या डाव्या हाताच्या मणक्याला फॅक्चर झाले रिधम चे वय वर्ष दोन असल्याने डॉक्टरांनी त्यावर तात्पुरते प्लास्टर केले. पण शस्त्रक्रिया केल्या शिवाय पर्याय नाही असे डॉक्टरांनी सांगितले अशा परिस्थितीत रिदमचे वडील यांनी मा.आमदार श्री.राजू पारवे यांच्या सोमवारी झालेल्या जनता दरबारी हा विषय काही कार्यकर्त्याच्या माध्यमातून मांडला श्री.राजू पारवे यांनी त्याला लगेच त्यांच्या रुग्ण सेवा केंद्राच्या माध्यमातून नागपूर येथील खासगी रुग्णालयात मंगळवार ला भरती केले आज रिदम रुग्णालयातून उपचार व यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून स्वतःच्या घरी पोचलाभीवगडे परिवारात रिदमच्या यशस्वी झालेल्या शस्त्रक्रियेने आनंदाचे वातावरण आहे