झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करून  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा


वरोरा तालुका प्रतिनिधी

गणेश उराडे 8928860058

 


वरोरा :- शिवसेनेचे ब्रीद वाक्य आहे की,80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण याचाच पायंडा घालुन युवासेनेनी सुद्धा एक हात मदतीचा  गोरगरीब,सर्वसामान्य जनतेला ज्या मूलभूत सोयीं सुविधांच्या समस्यांना तोंड द्यावे लागतात.याचाच एक धागा पकडून

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे युवासेना सचिव वरून देसाई,युवासेना कार्यकारिणी सदस्य रुपेश दादा कदम।,जिल्हा विस्तारक नित्यानंद त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य 

वरोरा शहरातील झोपडपट्टी भागात जाऊन पावसाचे पाणी गळत असलेल्या गोरगरीब रहिवाश्यांच्या घरावर ताळपत्री टाकून त्यांच्या घरी किराणा भरून दिला.आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस झोपडपट्टी भागात मोलमजुरी करणाऱ्या सर्व रहिवाश्यांच्या उपस्थित  युवासेनेने केक कापून साजरा केला.

युवासेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे यांच्या मार्गदर्शनात उपजिल्हाप्रमुख आलेख रट्टे यांनी कार्यक्रमाची रुपरेषा आखली.युवासेनेचे तालुका समन्वयक शुभम टोरे यांनी महत्वाचे योगदान तर दिलेच यासोबतच मनीष नंदनवार, रितीकेश मडावी,राहुल भालेराव,अदनान अली,महेश खामनकर,आशु बरडे, सम्यक खैरे,संदीप दाते,शिवम  त्रिवेदी,अमोल लोखंडे,वैभव खडारकर,निलेश कुमरे,अशा बहुसंख्य युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler