शिक्षण व शिक्षक आपल्या दारी अंतर्गत पुस्तके वाटप

शिक्षण व शिक्षक आपल्या दारी अंतर्गत पुस्तके वाटप

जनता कनिष्ट महाविद्यालय तथा जनता विद्यालय नेरी अनोखा उपक्रम


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रविण वाघे, 7038115037




नेरी येथील जनता कनिष्ठ महाविद्यालय तथा जनता विद्यालय नेरी व्दारा चालू शैक्षणिक सत्राला प्रारंभ करताना नविन विद्यार्थ्यांना शिक्षण व शिक्षक आपल्या  दारी योजने अंतर्गत मा एन एस येरणे सर प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक प्रवाहात नव चैतन्य निर्माण करण्यासाठी शाळेतील पाठयपुस्तके प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन स्वागत व अभिनंदन करून वर्ग 8 ते 10वी आणि 5 वीच्या विदयार्थ्यांना पाठयपुस्तके वितरित करण्यात आले आणि आणलाईन शिक्षणाबद्दल माहिती समजवून सांगण्यात आली 

              मागील दोन वर्षांत कोरोना मुळे शाळेची घंटा वाजली नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले  परंतु शिक्षण विभागाने योजलेल्या शिक्षक व शिक्षण आपल्या दारी आणि आणलाईन शिक्षण यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुळलीत सुरू होते आणलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांकडून अभ्यास करवून घेतले तसेच स्वाध्याय मालिका परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण प्रणालीत गुंतवून ठेवले आणि त्यांना यश प्राप्त करून दिले ज्या विद्यार्थ्यांना  शिक्षण प्रणालीत खूपच अडचणी असतील त्यांना त्यांच्या दारी जाऊन मार्गदर्शन केले परंतु त्यांच्या शिक्षणात अडचण येऊ दिली नाही अशाप्रकारे नवीन सत्रापासून दि28 जुलै पासून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या दारी जाऊन पाठयपुस्तके आणि आणलाईन शिक्षणाची माहिती देण्यात आली यावेळी 8 ते 10 च्या विद्यार्थ्यांना पाठयपुस्तके वितरित करताना एन एस येरणे सर प्राचार्य तथा  मुख्याध्यापक माधव पिसे सर बांबोळे सर मेश्राम सर तर वर्ग 5 वि साठी मोहन पिसे सर  संदेश पंधरे सर वैभव चौधरी जीवतोडे मॅडम आणि विद्यार्थी पालक उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler