वाघाच्या हल्यात शेतकरी ठार मुल तालुक्यातील घटना

वाघाच्या हल्यात शेतकरी ठार मुल तालुक्यातील घटना


सावली तालुका प्रतिनिधी

उमेश गोलेपल्लीवार 9623494935


सावली:- गुरे चारण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या मुल तालुक्यातील टेकाडी येथील शेतकरयावर वाघाने हल्ला  करून ठार केल्याची घटना सादागड बिटातील कक्ष क्रमांक 305 येथे 25 जुलै रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली .या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घाटू वळघु भोयर वय 70 रा.टेकाडी असे मृतकाचे नाव आहे.टेकाडी येथील घाटू भोयर हे नेहमीप्रमाणे शनिवारी गुरे चरण्यासाठी गावाजवळच्या मामा तलावाजवळील जंगल परिसरात गेला होता गुरे चारत असतानाच झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले.सांयकाळी गुरे परत आले परंतु घाटू भोयर घरी परत आले नाही तेव्हा घरच्यांना संसय आला गावातील लोकांना माहिती देऊन जंगल परिसरात शोधाशोध सुरू ‌केली असता त्याचा मृत्यू आढळून आला असता वनविभागच्या अधिकारी यांना माहीत दीली असता वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत कामडी आपल्या टीमसह  घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनांतर मृत्यूदेह कुटूबाच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील तपास वनधीकारी करत आहेत,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler