निमखेड लसीकरण केंद्रावर गोंधळ
पोलीस पाचारण नंतर शांतता
दे.राजा (ता.) प्रतिनिधीं
चंद्रभान झीने
आज दिनांक 13 रोजी निमखेड येथे लसीकरणाची ग्रामस्थांना सूचना मिळाल्या होत्या त्यानुसार निमखेड येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येत आले ग्रामीण विभागाला एकूण १30 लस दिलेल्या होत्या
कोरोना महामारी अजूनही गेलेली नाही उलट येणाऱ्या पुढील काळात नवीन आजाराने भीषण रूप घेण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तालुक्यामध्ये लसीकरणासाठी वेग घेण्यात आला परंतु ग्रामीण विभाग व महसूल विभागाकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात येत नाही त्या कारणाने प्रत्येक ग्रामीण विभागात गोंधळाचे चित्र दिसून येत आहे नागरिकांना देण्यात येणारे टोकन वेळ नोंदणीकृत तारीख यामध्ये प्रचंड तफावत असल्याने नागरिकांना मनस्ताप करावा लागत आहे त्यातच सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतकरी महिला व पुरुषांना वेळेचे भान ठेवूनच लसीकरणासाठी यावे लागते परंतु ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी हे आपल्याच माहितीतील नागरिकांना टोकन वाटप करत आहे व तोंड बघून टोकण देत आहे असे असल्याने रांगेमध्ये उभे राहिलेल्या नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला तर काही नागरिक सकाळी आठ वाजल्यापासून रांगेमध्ये ताटकळत उभे होते व परिचितांना टोकन दिल्याने प्रचंड गोंधळ झाला व हमरीतुमरीवर नागरिक आल्यानंतर स्थानिक पत्रकार यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना फोन लावून पाचारण करण्यात आले म्हणून लसीकरण शांततेत पार पडले या गोंधळामुळे नागरिकांकडून प्रशासनाचा बेजबाबदार पणाचा कळस गाठल्याचा रोष व्यक्त केला जात आहे
