मुसळधार पावसामुळे घर कोसळले गोंडपीपरी तालुक्यातील सकमुर येथील घटना

 मुसळधार पावसामुळे घर कोसळले गोंडपीपरी तालुक्यातील सकमुर येथील घटना


 गोंडपीपरी _प्रतिनिधी 

सतीश नेवारे 9823935413




गोंडपीपरी:-गोंडपीपरी तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून कधी दिवसा तर कधी रात्रीच्या सुमारास मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस कोसळत आहे.कोठे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत तर कोठे वीज कोसळून घराला आग लागत आहे.

अश्यातच दिनांक 1 जुलै रोज गुरवारला गोंडपीपरी तालुक्यातील सकमुर येथील रवी घुबडे यांचे घर पावसामुळे कोसळल्याची घटना घडली आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील सकमुर येथील रवी घुबडे हे मागील कित्येक वर्षपासून कुडामातीच्या घरात आपल्या कुटुंबासह वास्तव्य करीत आहेत.

आज दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे त्याचे घर कोसळले.सुदैवाने त्यावेळेस घरामध्ये कोणी नव्हते अन्यथा मोठा अपघात झाला असता.ऐन पावसाळ्यात आणि कोरोनाच्या काळात घर कोसळल्यामुळे राहायचं कुठ आणि खायच कुठ असा यक्षप्रश्न त्याच्यापुढे निर्माण झाला आहे.

त्यामुळे शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी विनंती प्रतिनिधीशी बोलतांना घुबडे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler