“कलाकारांना भेडसावणाऱ्या समस्या शुटिंग व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करून याला वाचा फोडण्यासाठी राज्य व्यापी आंदोलन “
संपादक ओम जायभाये
7058807386
रंगकर्मी,आंदोलन, पुणे,
मित्रांनो लवकरच कलाकारांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात आता भेडसावणाऱ्या समस्या, शुटींग व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यापासून तर दूरगामी कलाकाराच्या हिताच्या मागण्या केल्या जाणार आहेत.
हे आंदोलनाला कुठे गालबोट न लागता किंवा कुणीही राजकीय फायदा घेऊ नये म्हणून फक्त आपण एक रंगकर्मी म्हणून एकत्र येणार आहोत. त्यामुळे हे आंदोलन सर्व प्रकारच्या कलेतील कलाकारांना सोबत घेऊन केले जाणार आहे.
या आंदोलनाची दिशा रीतसर व स्पष्ट आहे. त्याची सुरुवात आपण वरील प्रकारे आपला व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्या लिंक ग्रुप वर शेअर करायच्या आहेत. त्यामुळे आंदोलन साठी एक पोषक वातावरण निर्मिती होईल. त्यानंतर तारीख डिक्लेअर करणार आहोत.
चला मग, मी कलाकार आहे आणि मला व गेल्या कित्येक दिवसांपासून करोनाच्या बंद मुळे लोकनाट्य चित्रपट नाटक लावणी वाद्यवृंद अशी आपल्या सर्वांची परिस्थिती अत्यंत हालाखीची चाललेली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून दास्ताने सर, शिवा बागुल, तसेच आमचे इतर सहकारी मित्र कलाकारांनी,
रंगकर्मी आंदोलन पुणे# हे आंदोलन करण्याचा विचार केल्या गेला आहे. बऱ्याच लहान मोठ्या कलाकारांच्या तोंडून ऐकले की शूटिंग चालु व्हावी. काम मिळावी तर मित्रांनो एवढे दिवस संयम ठेऊन आपल्या कलाकाराच्या पदरी निराशाच.. आता सरकारला आपल्या मागण्या मान्य कराव्याच लागतील. आणी आता बोलून नाही तर करून दाखवण्याची वेळ आहे. तरी सर्व कलाकारांना विनंती आहे हे सर्व करायचं असेल तर सर्वात आधी आपण सर्वांनी एकत्रित यायला पाहिजे. कुठल्या संघटनेचा पक्षाचा म्हणून नाही तर एक कलाकार म्हणून सहभागी होऊया.
कलाकारांनी कलाकारांसाठी सुरु केलेले आंदोलन म्हणजेच #रंगकर्मी आंदोलन पुणे# हे होय
मी एक कलाकार आणी रंगकर्मी आंदोलनात सामील होणे माझा अधिकार मंगेश सिरसाट कलाकारांसाठी मी आंदोलनात सहभागी होतोय. आपण ही व्हावे ही विनंती.
