देऊळगाव राजा शहरामध्ये अवैध रेती मुरूम वाहतूक जोरात.
मनसेची कारवाईची मागणी.
तालुका प्रतिनिधी देऊळगाव राजा
चंद्रभान झिने
तालुक्या मध्ये व शहरांमध्ये सुरू असलेले अवैध रेती वाहतूक मुरूम वाहतूक व शहरांमध्ये माफीया यांनी केलेला अवैध साठा व ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी तालुकाध्यक्ष. राजूभाऊ मांनटे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अवैध रेती माफिया विरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. तहसील कार्यालयामध्ये अनेक वेळा संघटना गावकऱ्यांनी वेळोवेळी तहसीलदार यांना निवेदन देऊनही कोणतीच कारवाई झालेली नाही तालुक्यांमध्ये तहसील कार्यालयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. तहसील मधील काही अधिकारी कर्मचारी रेती माफियांना पाठीसी घालण्याचं काम करत आहे.
अशी चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये होत असून तसेच रेती घाटावर रेती ठेकेदार यांनी महसूल परवानगीपेक्षा अधिक रेती उत्खनन करून काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून शासनाची फसवणूक केलेली आहे.
मनसेने कारवाईचे निवेदन मा जिल्हाधिकारी बुलढाणा.मा तहसीलदार पोलीस स्टेशन यांना दिले आहे. रेती माफियावर योग्य ती कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल काही हाणी झाल्यास आपण व आपले कार्यालय सर्वस्वी जबाबदार राहील असे निवेदनात यांनी नमूद केले आहे.
तालुकाध्यक्ष राजू मांनटे.बाळ राजे देशमुख. सय्यद नईम. प्रकाश बन्सी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. रेती माफियांवर व ठेकेदारावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
